• Download App
    पालक मंत्री यशोमती ठाकूर यांच्या दूर्लक्षामुळेच गेले दीपाली चव्हाण यांचे प्राण|Deepali Chavan's life was lost due to the negligence of Guardian Minister Yashomati Thakur

    पालक मंत्री यशोमती ठाकूर यांच्या दूर्लक्षामुळेच गेले दीपाली चव्हाण यांचे प्राण

    लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपाली चव्हाण यांना त्रास देणाऱ्या शिवकुमारला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनीच पाठीशी घातले. माजी वनमंत्री संजय राठोड यांचा त्याच्यावर वरदहस्त होताच; पण पालक मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे त्याच्याविरुध्द तक्रारी झाल्या होत्या. तरीही ठाकूर यांनी त्याकडे दूर्लक्ष केले.Deepali Chavan’s life was lost due to the negligence of Guardian Minister Yashomati Thakur


    विशेष प्रतिनिधी 

    अमरावती : लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपाली चव्हाण यांना त्रास देणाऱ्या शिवकुमारला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनीच पाठीशी घातले. माजी वनमंत्री संजय राठोड यांचा त्याच्यावर वरदहस्त होताच; पण पालक मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे त्याच्याविरुध्द तक्रारी झाल्या होत्या. तरीही ठाकूर यांनी त्याकडे दूर्लक्ष केले.

    मेळघाटातील वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत विनोद शिवकुमार यांने त्यांचा छळ केल्याचे म्हटले होते. दीपाली यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न त्याने केला होते. याच शिवकुमार याच्याविरुध्द अनेक तक्रारी होत्या.



    महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे वर्षभराआधी तक्रार केली होती. या संदर्भात यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. मात्र नंतर काहीच आढावा घेतला नाही. या तक्रारींची वेळीच दखल घेतली असती तर कदाचित दीपालीची आत्महत्या टाळता आली असती, अशी चर्चा आता वन विभागात सुरू आहे.

    गेल्या वर्षी ८ मार्चला महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना एक निवेदन सादर केले होते. त्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अपवाद वगळता कुठेही अंतर्गत तक्रार निवारण समिती (विशाखा) नाही, अशी गंभीर तक्रार केली होती.

    मेळघाटातील संरक्षण शिबिरात महिलांना मुक्कामी राहून अत्यंत असुरक्षित वातावरणात काम करावे लागते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होत असलेल्या समस्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करावी आणि दोषी अधिकाºयांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी या संघटनेने के ली होती.

    दीड वर्षांपूर्वी खासदार नवनीत राणा या मेळघाट दौऱ्यावर असताना दीपाली यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. नंतर काही महिन्यांनी अमरावतीत प्रत्यक्ष भेट घेऊन उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याने चालवलेल्या छळाविषयी तक्रोरही केली.

    नवनीत राणा यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्याशी संपर्क साधून एकतर विनोद शिवकुमार यांचे किं वा ते शक्य होत नसल्यास दीपाली यांची तेथून बदली करावे, अशी सूचना के ल्यावरही रेड्डी यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

    २० ऑक्टोबर२०२० रोजी आमदार रवी राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनाही याबाबत पत्र लिहिले. पण या पत्राकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे नवनीत राणा यांचे म्हणणे आहे.

    मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अपर प्रधान मुख्य संरक्षक एम.एस. रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन अचलपूर येथील जलदगती न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी दिली आहे. रेड्डी यांनी त्यांच्या वकिलामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी अर्ज दाखल केला होता.

    Deepali Chavan’s life was lost due to the negligence of Guardian Minister Yashomati Thakur

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस