• Download App
    उद्धव साहेबांना आवाहनाचा कदाचित आज शेवटचा दिवस; दीपक केसरकरांचे सूचक वक्तव्य Deepak kesarkar once again says, let's go with BJP and form the government in maharashtra

    शिंदे गटाचा अल्टिमेटम : उद्धव साहेबांना आवाहनाचा कदाचित आज शेवटचा दिवस; दीपक केसरकरांचे सूचक वक्तव्य

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात आता थेट सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुवाहाटी त्यांच्याबरोबर गेलेले आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला असला तरी प्रत्यक्षात सत्तांतराच्या हालचालीचा फारच पुढे गेल्या आहेत. शिवाय स्वतः एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील हॉटेल बाहेर येऊन कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही. असला तर एखादे नाव सांगून दाखवा, असे आव्हान संजय राऊत आणि शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. Deepak kesarkar once again says, let’s go with BJP and form the government in maharashtra

    केसरकर यांनी मांडलेली भूमिका अशी

    • आजही आम्ही परत यायला तयार आहोत, उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा. काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत आघाडी तोडून भाजपासोबत सरकार स्थापन करावे.
    • आम्हाला गद्दार म्हणण्याचा एकाही शिवसैनिकाला अधिकार नाही. आम्ही हे वारंवार सांगितलं आहे. मी आजही सांगतो की अजूनही निर्णय द्या, आमची परत यायची तयारी आहे. २०-२१ आमदार आमच्या संपर्कात आहेत असं उगाच सांगू नका. एक-दोन लोकांची नावं सांगा, त्यांनाही मुंबईत आणून पोहोचवतो. आम्ही मांडलेली भूमिका शिवसेनेच्या हिताची आहे. किती वेळा हात जोडायचे यालाही मर्यादा आहेत.
    • उद्या जर कुणी मला गद्दार म्हटलं, तर त्या शिवसैनिकांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार मला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जसं मी पत्र पाठवलं, तसंच पत्र सगळ्या शिवसैनिकांना पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागलं, डुकरं, मेलेली प्रेतं, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागलं, तर ते कोण सहन करणार?
    • आज माझ्या दृष्टीने शेवटचा दिवस आहे. आमच्या पक्षप्रमुखांचं आज जे स्थान आहे, त्यांचा मान राखून राज्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे अशी इच्छा होती. पण ते आपल्या विचारांशी ठाम आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचं आहे. त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा मी हे आवाहन करू शकेन.
    • आमच्या आवाहनाचा विचार होणार नसेल आणि उद्या आम्हाला जायला लागलं, अविश्वास ठरावावर मतदान करावं लागलं, तर ते मतदान उद्धव ठाकरेंच्या विरोधात नसेल, एवढंच आमचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. सुरुवातीला भाजपासोबत बोलणी फिसकटल्यानंतर आम्ही सगळे आमदार त्यांच्यासोबत उभे होतो. नंतर जी परिस्थिती उद्भवली, ती त्यांच्यासमोर वेळोवेळी मांडली आहे.
    • उद्या राज्यपालांनी सांगितलं की या सरकारचं बहुमत गेलं आहे, विश्वासदर्शक ठराव आणा, तर आणायलाच लागेल. विधानसभेत त्यावर मतदान घ्यावे लागेल.

    Deepak kesarkar once again says, let’s go with BJP and form the government in maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    श्यामची आई 71 वर्षांनंतरही दिल्लीत सुपरहिट; राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!

    Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा

    Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा सिंह कोर्टात भावुक म्हणाल्या- भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल; संन्यासी असूनही बदनामी केली