Wednesday, 7 May 2025
  • Download App
    राज्यात रुग्णसंख्येत घट , 447 जणांचा मृत्यू ; मंगळवारी 14 हजार 123 जणांना कोरोना Decline in the number of patients in the state, 447 deaths

    Corona Update : राज्यात रुग्णसंख्येत घट , 447 जणांचा मृत्यू ; मंगळवारी 14 हजार 123 जणांना कोरोना

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात मंगळवारपासून परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. परंतु, राज्यात मंगळवारी 14 हजारांवर नवे रुग्ण सापडले असून मृतांचा आकडाही मोठा आहे. 447 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. Decline in the number of patients in the state, 447 deaths

    लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसेच काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत दिलासादायक घट आहे तिथं निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यास स्थानिक प्रशासनाला सांगितले होते. मंगळवारच्या कोरोनाच्या आकडेवारीचा विचार करता यातून दिलासा आणि चिंता या दोन्ही बाबी समोर येत आहेत. नव्या रुग्णांचा राज्यातला आकडा 14 हजार 123 वर आला आहे. मंगळवारी 477 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला.

    विविध जिल्ह्यातील चित्र

    कोल्हापूर जिल्ह्यात 32 जणांचा मृत्यू आला तर वसई विरार पालिका हद्दीत 31 मृत्यू ,बीडमध्ये 29, सातारा 28, अहमदनगर 26, रायगड 22, नाशिक 20 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाची काळजी वाढली आहे.
    काही ठिकाणी पालिका हद्दीतील मृतांचे आकडे वेगळे आहे. उदाहरणार्थ नाशिक पालिका हद्दीत 21 मृत्यू झाले आहेत. त्यामुळं मृतांचा आकडा कमी होत नसल्याचं दिसतंय.

    54 हजार जणांची आजारावर मात

    राज्यात मंगळवारपर्यंत 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळं रिकव्हरी रेट 94.28 एवढा झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2 लाख 30 हजार 681 आहे.

    Decline in the number of patients in the state, 447 deaths

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!