वृत्तसंस्था
पुणे : रेल्वे प्रवाशांची संख्य घटल्याने पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह आता १४ मेपासून डेक्कन क्वीनही रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता लांब पल्ल्याच्या गाड्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे. Deccan Queen also canceled along with Indrayani Express from tomorrow
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर परिस्थिती सुधारल्यामुळे रेल्वेगाड्या सुरू झाल्या होत्या. त्यात पुणे-मुंबई दरम्यानची इंद्रायणी एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीनचा समावेश होता. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता.
आता कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली. पर्यायाने प्रवासी संख्या आणि आरक्षण घटले. त्यामुळे अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गेल्याच आठवड्यात पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द झाली होती. ही गाडी जूनअखेरपर्यंत धावणार नाही.
त्यापाठोपाठ आता पुणे-मुंबई डेक्कन क्वीनही रद्दचा निर्णय घेतला आहे. ही गाडी १४ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहेत. डेक्कन क्वीनसह कोल्हापूर-मुंबई ही गाडीही १८ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द झाली.
यापूर्वी रद्द झालेल्या गाड्या
पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापूर-नागपूर, दादर-पंढरपूर, दादर-शिर्डी, मुंबई-गदग, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-बिदर, मुंबई-लातूर, पुण्याहून प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि शनिवारी धावणारी पुणे-अहमदाबाद एक्स्प्रेस, पुणे-फलटण, लोणंद-फलटण
या मार्गावरील डेमू रेल्वेचा समावेश आहे. पुणे-मुंबई प्रवासासाठी स्वतंत्र गाडी नाही. मात्र, दक्षिणेकडून पुणेमार्गे मुंबईकर्डे किंवा गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे.
Deccan Queen also canceled along with Indrayani Express from tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- चीनमधून लिहिला गेला लॅन्सेटमध्ये मोदींविरोधात लेख, बिजींगमधील महिला संपादकाने घेतली सुपारी!
- आमदार बनसोडेंवर गोळीबार झालाच नाही, उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनीच तानाजी पवारला केली बेदम मारहाण
- कोरोनाविरोधी लढ्यात नौदलाचे ऑपरेशन समुद्रसेतू
- भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, सीरम, भारत बायोटेक वाढविणार लसींचे उत्पादन
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तोडले तारे, म्हणे मोदी सरकारला समांतर सरकार सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावे