• Download App
    जीवे मारण्याची धमकी; तक्रारीची दखल घेतल्याबद्दल निखिल वागळेंकडून देवेंद्र फडणवीसांचे आभार|Death threats; Thanks to Devendra Fadnavis from Nikhil Vagle for taking note of the complaint

    जीवे मारण्याची धमकी; तक्रारीची दखल घेतल्याबद्दल निखिल वागळेंकडून देवेंद्र फडणवीसांचे आभार

    प्रतिनिधी

    मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्याशी झालेल्या वादात पत्रकार निखिल वागळे यांना सोशल मीडियावरून अनेकांनी धमक्या दिल्या. या धमक्यांनंतर निखिल वागळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचे नमूद केले. निखिल वागळे यांच्या या ट्विटची दखल घेऊन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निखिल वागळे यांच्या सुरक्षिततेविषयी खबरदारी घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. याबद्दल निखिल वागळे यांनी फडणवीस यांचे आभार मानणारे ट्विट केले आहे.Death threats; Thanks to Devendra Fadnavis from Nikhil Vagle for taking note of the complaint

    माझ्या तक्रारीची दखल तातडीने घेऊन पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री, गृहमंत्री @Dev_Fadnavis यांना मनःपूर्वक धन्यवाद, असे निखिल वागळे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.



    वागळे – सुजात आंबेडकर वाद काय?

    देशातले सगळे विरोधी राजकीय पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करायला उताविळ झालेच आहेत, पण त्यापेक्षा जास्त उताविळी पुरोगामी वर्तुळातून दिसते आहे. पण यावरूनच या पुरोगामी वर्तुळात सध्या निखिल वागळे विरुद्ध सुजाता आंबेडकर असे प्रचंड घमासान सुरू आहे.

    वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करीत नाही. ते स्वतंत्र लढून भाजपलाच मदत करतात अशा आशयाची टीका निखिल वागळे यांनी केली, त्यावर वंचित बहुजन आघाडीतून निखिल वागळे वर तुफान हल्लाबोल सुरू झाला. त्यातच प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे देखील सामील झाले. सोशल मीडियात यावरून ट्विटर वॉर सुरू झाले. फेसबुक वरून भडीमार सुरू झाला. यातच निखिल वागळे यांचे एक ट्विट आले आणि त्यात त्यांनी सुजात आंबेडकर यांना थिल्लर या शब्दात संबोधले. त्यामुळे सुजात आंबेडकरांचे समर्थक प्रचंड संतापले. त्यांनी निखिल वागळे यांना वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वरून जोरदार धमक्या दिल्या. तो वाद थेट ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादापर्यंत येऊन ठेपला. निखिल वागळे यांनी यासंदर्भात अनेक खुलासे केले. आपण जन्माने सारस्वत ब्राह्मण असलो तरी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आलो आहोत. पुरोगामी चळवळीला वाहून घेतले आहे, असे म्हटले आहे.

    मात्र निखिल वागळे यांनी सुजात आंबेडकर यांना थिल्लर का म्हटले?, यावरून आंबेडकर समर्थक संतप्त झाले असून त्यांनी निखिल वागळे यांचे शरद पवारांच्या बाजूचे अनेक ट्विट शेअर केले आहेत. त्यावरून निखिल वागळे वर जोरदार टीकेची जोड उठली आहे.

    अर्थात निखिल वागळे काय किंवा सुजात आंबेडकर काय दोन्ही बाजूंचे समर्थक मोदींच्या पराभवासाठी प्रचंड आक्रमक आहेत. पण सध्या मात्र त्यांच्यातच सोशल मीडियावर घमासान चालल्याचे दिसत आहे.

    Death threats; Thanks to Devendra Fadnavis from Nikhil Vagle for taking note of the complaint

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!