एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू झाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ इको कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांना प्राण गमवावे लागले. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. Death of three devotees after visiting Ekvira Devi, 9 serious including child
विशेष प्रतिनिधी
पालघर : एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू झाला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ इको कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांना प्राण गमवावे लागले. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. आवंढाणी गावाच्या हद्दी सती माता हॉटेलच्या समोर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरात मार्गिकेवर भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिली. दर्शन घेऊन घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
हेमंत तरे (वय 60 वर्ष) , राकेश तामोरे (वय 42 वर्ष) आणि सुषमा आरेकर (वय 32 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. सर्व भाविक पालघरमधील दांडी येथील रहिवासी आहेत. अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Death of three devotees after visiting Ekvira Devi, 9 serious including child
महत्त्वाच्या बातम्या