सदर अभ्रक चार ते पाच दिवसांचे असावे .तसेच अभ्रक कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते निर्दयी व्यक्तीने तीन ते चार दिवसांपूर्वी फेकल्याचा अंदाज आहे. Dead mica found rotting in Nala; Police file charges against unknown parents
विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोल्यातील अकोट अंजनगाव मार्गावर अकोट ग्रामीण पोलीस हद्दीत येणाऱ्या नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत मानव जातीचे अभ्रक आढळले आहे.त्यामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.पत्रकार दिनेश बोचे यांनी अकोट अंजनगाव मार्गावर अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या कार्ला येथील नाल्यात मानव जातीचे अभ्रक असल्याचे अकोट ग्रामीण पोलिसांना सदर माहिती दिली .
माहिती मिळताच घटनास्थळी अकोट ग्रामीण व अंजनगाव पोलिस दाखल झाले होते.घटनास्थळी अंजनगाव पोलिस अधिकारी ,अकोट ग्रामीणचे विजय पंचबुद्धे ,पोलीस उपनिरीक्षक सुनील रुपदे ,योगेश जउळकर कांबळे ,डोईफोडे विलास अस्वार यांनी येऊन पंचनामा केला.
सदर अभ्रक चार ते पाच दिवसांचे असावे .तसेच अभ्रक कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते निर्दयी व्यक्तीने तीन ते चार दिवसांपूर्वी फेकल्याचा अंदाज आहे. अभ्रक पेटिकोट मध्ये गुंडाळलेले दिसून आले.अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अनंत चिंचोलकर यांनी फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Dead mica found rotting in Nala; Police file charges against unknown parents
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हणणे धोकादायक, बेजबाबदारपणे याची चर्चा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत
- जगाच्या शिखरावर उभारला पूल, तब्बल १९ हजार फुटावरून जाणारा सर्वात उंचीवरील रस्ता झाला सुरू
- विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या समितीत केवळ एकच महिला सदस्या
- उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथच, २३० ते २४९ जागांवर विजय मिळविण्याचा सर्वेक्षणात अंदाज