• Download App
    Dattatrey gade स्वारगेट बलात्कारातील आरोपी दत्तात्रय गाडेचे राष्ट्रवादी कनेक्शन; राष्ट्रवादीच्या आमदाराची शरिया पद्धतीचे कायदे लागू करण्याची मागणी!!

    Dattatrey gade स्वारगेट बलात्कारातील आरोपी दत्तात्रय गाडेचे राष्ट्रवादी कनेक्शन; राष्ट्रवादीच्या आमदाराची शरिया पद्धतीचे कायदे लागू करण्याची मागणी!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावात जाऊन अटक केली. त्याला पोलिसांनी पुण्यात आणले. त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी काँग्रेसशी कनेक्शन असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भारतामध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये असलेले शरिया टाईपचे कायदे लागू करा अशी मागणी केली.

    स्वारगेट बस स्थानकातील उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाले असे उघड झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर संताप उसळला. पोलिसांनी १३ पथके स्थापन करून आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी सापळा लावला अखेरीस त्याच्या गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी त्याला मध्यरात्री अटक केली.

    मात्र दत्तात्रय गाडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पोस्टरवर त्याचा फोटो आढळून आला. त्याच बरोबर त्याच्या मोबाईल व्हाट्सअप डीपीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आढळला. यातून दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी काँग्रेसशी कनेक्शन उघड झाले.

    या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी भारतामध्ये पाश्चात्त्य देशांमध्ये असलेले कायदे लागू करण्याची मागणी केली. आपण शरिया कायद्याचे समर्थन करत नाही. पण त्या टाईपचे कायदे लागू केले, तर बलात्कारासारख्या घटना कमी होतील, असा दावा त्यांनी केला. पाश्चात्य देशांमध्ये चोरी केले तर हात कापण्याची शिक्षा आहे. त्या देशांमध्ये कुणी दोन वेळा चोरी केली तर त्याचे दोन्ही हात कापतात, तशाच कठोर शिक्षा भारतात असायला हव्यात. महाराष्ट्रात गुन्हेगारी घटना वाढल्या असल्या, तरी त्या आटोक्यात आणायला पोलीस समर्थ आहेत‌. त्यामुळे लगेच महाराष्ट्राचा बिहार झाला असे म्हणू नका, असे इद्रिस नायकवडी म्हणाले.

    Dattatrey gade NCP connection; NCP MLC demands shriya type law

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार, मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?