प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात 7 हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे, अशी घोषणा अलिकडेच केली होती. परंतु राज्य सरकार तारखा जाहीर करत नव्हते. परंतु आता यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण देत जूनच्या १५ तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. Date of Police Recruitment Process for 15000 Posts in Maharashtra
१५ जूनपासून भरती प्रक्रिया
पोलीस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी १५ हजार पदे भरण्याची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा
गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात ५० हजार पोलीस पदे रिक्त आहेत. लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. गृहविभागाच्या या निर्णयामुळे जे विद्यार्थी, पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या तरूणांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून १५ जून पासून भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० आणि दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पोलीस भरती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते.
Date of Police Recruitment Process for 15000 Posts in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांवर थेट शरसंधान साधत संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार!!
- राज्यसभा निवडणूक : संभाजीराजांचे गणित जुळेना, माघारीची आक्रमक तयारी!!; पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष
- 2024 : कलम 144 नव्हे, भाजपसाठी मिशन 144; काटेकोर नियोजनासह मोर्चेबांधणी!!
- Gandhi – Savarkar – Jinnah : गांधी – सावरकर – जीना एकत्रित बैठकीचा प्रस्ताव कोणी दिला होता??, पण ती कोणी टाळली…??