या ठिकाणी उत्खनन करुन हे अवशेष शोधून काढावे व पुन्हा त्या ठिकाणी हे दोन मंदिर उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेतून राज्यभरातील अवैधरित्या उभारण्यात येत असलेल्या दर्गा व मशिदींवर राज्य सरकारने कारवाई करून ते हटवावेत असे म्हटले होते. शिवाय त्यांच्या या सभेच्या दुसऱ्याची दिवशी माहिम येथील अवैधरित्या बांधला जात असलेला दर्गा प्रशासनाकडून पाडण्यातही आला होता. याच पार्श्वभूमीवर आता मनसेने पुण्यातील पुण्यश्वर व नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दाही पुन्हा एकदा समोर आणला आहे. Dargya encroachment on the site of historical Punyashwar and Narayaneshwar temple in Pune MNS claim
मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेत पुण्यातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्ग्याचं अतिक्रमण असल्याचा दावा केला आहे. शिवाय, राज्य सरकारने हा दर्गा हटवावा अशी मागणीही केली आहे. विशेष म्हणजे पुण्यश्वर व नारायणेश्वर मंदिराचा मुद्दा नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींचे मानले आभार
पुण्यातील कसबा पेठेत एकेकाळी पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर होते. मात्र, औरंगजेबाच्या काळात हे मंदिर पाडले जाऊन तेथे दर्गा उभारण्यात आला. या दर्ग्याच्या खाली मंदिराचे अवशेष आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्खनन करुन हे अवशेष शोधून काढावे व पुन्हा त्या ठिकाणी हे दोन मंदिर उभारावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारकडे केली आहे.
Dargya encroachment on the site of historical Punyashwar and Narayaneshwar temple in Pune MNS claim
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून या दोन समाजांना दिला ‘फायदा’
- केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, चार टक्के DA वाढवला
- बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा तरी आमदारकी होणार नाही रद्द; सोशल मीडियावर चर्चा, पण कारण काय??
- राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचा मोठा बवाल; पण गेल्या 10 वर्षांत बाकीच्या पक्षांच्याही 11 आमदार, खासदारांचे सदस्यत्व रद्द!!