प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील 8 प्लॉट आणि दादरमधील फ्लॅटवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये किहीम बीच जवळचा प्लॉट देखील समाविष्ट आहे. संजय राऊत यांनी मनी लॉन्ड्रिंगमधल्या पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.Dadar’s flat and land near Kihim Beach confiscated
– वाधवान – प्रवीण राऊत संबंध
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला 672 भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी गोरेगावच्या पत्राचाळ प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित काळात राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते.
– म्हाडाची दिशाभूल
सोसायटी, म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला. पण गुरू आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 विकासकांना एफएसआय विकून अंदाजे 901.79 कोटी रुपये 672 विस्थापितांसाठी वसूल केले.
– 138 कोटींचे बुकिंग
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने मिडोज नावाचा एक प्रकल्प सुरू केला आणि फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे 138 कोटी रुपयांचे बुकिंग घेतले. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी बेकायदेशीर कृत्यांमधून केलेल्या गुन्ह्याची एकूण रक्कम अंदाजे 1039.79 कोटी रूपये आहे. गुन्ह्याच्या कमाईचा काही भाग जवळच्या सहकाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आला.
– मनी ट्रेल तपास
आतापर्यंत केलेल्या मनी ट्रेल तपासानुसार एचडीआयएलकडून (HDIL) प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली होती.
– गुन्ह्यातले पैसे वर्षा राऊतांच्या खात्यावर
1034 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत निकटवर्तीय प्रवीण राऊत याला ईडीने अटक केली. 2010 मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी 55 लाख रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचेही उघड झाले आहे. वर्षा राऊत संजय राऊत यांच्या पत्नी आहेत.
– 11 कोटी 15 संपत्ती जप्त
वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची 11 कोटी 15 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. प्रवीण राऊत यांची पालघर, सफाळे, पडगामधील जमीन जप्त करण्यात आली आहे. वर्षा संजय राऊत यांचा दादरमधील प्लॅट आणि अलिबागमधील किहीम बीचजवळची जमीन जप्त करण्यात आली आहे. किहीम बीचजवळची जमीन ही वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर आहे.
Dadar’s flat and land near Kihim Beach confiscated
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणाचे कर्नाटकात पडसाद; मशिदींवरील भोंग्यांवर बंदीची हिंदुत्ववाद्यांची मागणी!!
- Sanjay Raut ED Action : संजय राऊतांची मुंबईतला फ्लॅट आणि अलिबागमधली जमीन ईडीकडून जप्त!!
- Congress Ahmad Patel : अहमद पटेलांचा मुलगा फैजल काँग्रेस हायकमांड वर नाराज; वाटचाल “आप”च्या दिशेने!!
- लष्करी शेती अन् दुग्धशाळा आता होणार इतिहासात जमा; शेकटकर समितीने केली होती शिफारस