विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pigeons at Dadar उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी कबुतरखान्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली होती. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली होती. त्यानंतर आज देखील दादरमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज उच्च न्यायालयात झाली. यात न्यायालयाने आधी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. इतकेच नाही तर आदेशाचे पालन केले जाईल, याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.Pigeons at Dadar
या प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले आहे. नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे पालिकेचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये. आमच्या आदेशाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात दात मागू शकतात, असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमावी, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.Pigeons at Dadar
जैन आणि गुजराती समाजाच्या लोकांवर ताडपत्री फाडल्याचा आरोप
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत या माध्यमातून एक नवीन वाद निर्माण झाला आहे. आता हा मुद्दा राजकीय बनला आहे आणि आता तो स्थानिक विरुद्ध बाहेरील असाही करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्याबाबत कडक भूमिका घेतली आहे. ज्या चौकांमध्ये लोक कबुतरांना खायला घालतात त्या ठिकाणी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, दादर कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालण्यासाठी वापरण्यात येणारी ताडपत्री फाडल्याचा आरोप जैन आणि गुजराती समाजाच्या लोकांवर आहे. तर मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यात बाहेरची लोक घुसली असल्याचा आरोप केला आहे.
जैन समुदाय आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांचा विरोध
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातली आहे. आरोग्याच्या कारणास्तव उच्च न्यायालयाने ही बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाने असेही आदेश दिले आहेत की जर कोणी कबुतरांना खायला घातले तर त्याला पकडले पाहिजे आणि तुरुंगात पाठवावे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसीने कबुतरखान्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र, जैन समुदाय आणि प्राणी हक्क कार्यकर्ते कबुतरांना खायला देण्यावरील बंदीला विरोध करत आहेत. ते म्हणतात की कबुतरांना खायला देण्यासाठी दुसरी जागा आधी निर्माण करा, अन्यथा पक्षी उपासमारीने मरतील.
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, तरी समाज आक्रमक
हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. यात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बीएमसी कबुतरांना मर्यादित धान्य देईल. बुधवारी कबुतरखान्यावर ताडपत्री झाकण्यात आली होती. संतप्त जैन समुदायाने ताडपत्री फाडून कबुतरांना खायला दिल्याचा आरोप आहे. त्या लोकांना कबुतरांना खायला घालण्यापासून रोखण्यासाठी बीएमसीने पुन्हा ताडपत्री लावली.
मनीषा कायंदे यांनी गुजरातचा उल्लेख करून प्रश्न उपस्थित केले
या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात यावरुन राजकारण सुरू झाले. शिवसेनेनेही या कृत्याचा निषेध केला. शिवसेना आमदार आणि पक्षाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, दादर कबुतरखान्याबाहेर जैन समुदायाकडून खूप विरोध होत आहे. हे आंदोलन कोणत्या कायद्यानुसार योग्य आहे? त्या म्हणाल्या की जेव्हा गुजरातमध्ये पतंगोत्सव असतो तेव्हा अनेक पक्षी धारदार दोरीने कापले जातात. अनेकांना दुखापत होते. मग कोणीही पुढे येऊन तो धार्मिक मुद्दा का बनवत नाही? कबुतरांमुळे आजार होतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. याचा धर्माशी काहीही संबंध नाही.
भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा देखील कबुतरखान्याच्या ठिकाणी पोहोचून जिथे ताडपत्री फाडण्यात आली त्याची पाहणी केली. त्यांनी निदर्शकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला. त्यांनी निदर्शकांनी कायदा हातात घेऊन कबुतरांना खायला घालण्याचे कृत्य दुर्दैवी असल्याचे म्हटले. लोढा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी संतुलन राखले आहे आणि परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहिले आहे, त्यामुळे हे सर्व योग्य नाही.
Ban on Feeding Pigeons at Dadar’s Kabutarkhana Remains; Court Orders Expert Study
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi राहुल गांधींचे ‘मतचोरी’चे आरोप फोल, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे
- Municipal Commissioner : पालिका आयुक्तांनी जरा अती केलं का ?
- Hard Facts : ट्रम्पशी पंगा झाला म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपलेले नाहीत, भारत चीनच्या कह्यात देखील गेलेला नाही!!
- Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त संवाद हटवणार