Cyclone Tauktae : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ ‘तोक्ते ’चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाने आता दिशा बदलली असून ते कोकण, गोवा किनारपट्टीकडे सरकत आहे. या वादळात ताशी 50 किमी किंवा त्याहून जास्त वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. या तोक्ते चक्रीवादळाची लाइव्ह स्थिती कशी पाहता येईल व हे विचित्र नाव कसे पडले याची माहिती येथे देत आहोत. Cyclone Tauktae Live Updates, Live Map Of Cyclone Tauktae, Know How Cyclone Gates Names
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ ‘तोक्ते ’चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाने आता दिशा बदलली असून ते कोकण, गोवा किनारपट्टीकडे सरकत आहे. या वादळात ताशी 50 किमी किंवा त्याहून जास्त वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. या तोक्ते चक्रीवादळाची लाइव्ह स्थिती कशी पाहता येईल व हे विचित्र नाव कसे पडले याची माहिती येथे देत आहोत.
दक्षिणपूर्व अरबी समुद्रात तसेच लक्षद्वीपमध्ये गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दि.16 मे रोजी चक्रीवादळात तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ ज्या मार्गावरून व ज्या वेगाने जाणार आहे, त्यावरून ते 18 मे रोजी किंवा नंतर गुजरात व पाकिस्तानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, या चक्रीवादळाच्या मार्गावरील म्हणजेच कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र तसेच गुजरातेतील सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून 16 ते 17 मे रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
येथे पाहा तोक्ते चक्रीवादळाची लाइव्ह स्थिती
(टीप : चक्रीवादळाची प्रत्यक्ष स्थिती तुम्ही accuweather, ventusky, IMD, skymetweather अशा इतरही हवामान संस्थांवर पाहू शकता.)
चक्रीवादळांना कशी पडतात ही विचित्र नावे?
- अरबी समुद्रात आलेल्या वादळाला ‘तोक्ते’ हे नाव म्यानमार या देशाने दिले आहे.
- समुद्रातील प्रत्येक चक्रीवादळाचे हवामान खात्याकडून नामकरण होत असते. याची सुरुवात पाश्चात्य देशांमधून झाली. ही नावे देण्यालाही शंभर वर्षांचा इतिहास आहे. इ.स. १९०० च्या काळात चक्रीवादळांना स्त्रीलिंग नावे दिली जात होती. नंतर त्यात बदल झाले. आता जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावे ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. यानुसार विविध देश नावे सुचवत असतात.
- ज्या भागामध्ये चक्रीवादळं तयार होतात त्याच्या आजूबाजूचे देश एकत्र येऊन चक्रीवादळाच्या नावांची यादी तयार करते. यानंतर क्रमाने वादळांना ही नावे दिली जातात.
- हिंदी महासागराच्या हद्दीत येणाऱ्या वादळांची नावे प्रामुख्याने भारत, बांग्लादेश, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे देश ठेवतात.
- इ.स. 2000 पासून या हद्दीतील वादळांची नावे ठेवण्याची परंपरा सुरू आहे. प्रत्येक देशाने वादळांसाठी स्वत:कडून 64 वेगवेगळी नावे सुचवलेली आहेत. ही सर्व नावांची यादी जागतिक हवामानशास्त्र संघटनेकडे नोंद झालेली आहेत. यानुसारच वादळांना नावे देण्याचे काम होते.
- वादळांची नावे ठरवताना त्यातही काही नियम आहेत. ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाला नाव दिले होते. नाव देताना त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. महासागरानुसार निश्चित केलेल्या झोननिहाय त्यातील देश नावे सुचवत असतात.
- भारताने मेघ, सागर, वायूसारखी सामान्य नावे यापूर्वी दिली आहेत.
Cyclone Tauktae Live Updates, Live Map Of Cyclone Tauktae, Know How Cyclone Gates Names
महत्त्वाच्या बातम्या
- वादग्रस्त : शार्ली हेब्दोचे भारतातील ऑक्सिजन तुटवड्यावर व्यंगचित्र, 3.3 कोटी देवतांचा दाखला देत हिंदू धर्माचाही उपहास, वाचा सविस्तर…
- पंजाबच्या काँग्रेस सरकारकडून ईदची भेट, मुस्लिमबहुल मालेरकोटला बनला 23वा जिल्हा, मुख्यमंत्र्यांकडून सवलतींचा पाऊस
- Shootout At Chitrakoot Jail : तुरुंगातच झाला गँगवार, मुख्तार गँगरच्या दोघांची हत्या करणाऱ्या गँगस्टरचेही एन्काउंटर
- राज्यपाल धनखड यांचा आसाम दौरा, राज्यपालांना पाहताच वृद्धाला अश्रू अनावर, सांगितले तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य
- मराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी, खा. संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र