• Download App
    युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च Cycle track costs 500 times more than the highway in Mumbai

    युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील युवराज म्हणनू ओळखले जात असलेले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टाची मुंबई महापालिकेला तब्बल १६८ कोटी रुपये किंमत चुकवावी लागणार आहे. वांद्रे ते माहीम येथे प्रस्तावित सायकल ट्रॅकसाठी महामार्गाच्या कामापेक्षा ५०० पट अधिक खर्चाची निविदा करण्यात काढण्यात आली आहे. Cycle track costs 500 times more than the highway in Mumbai

    पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील ३.७४ किलोमीटर लांबीच्या सायकलिंग ट्रॅकच्या १६८ कोटी रुपयांचे काम प्रस्तावित आहे. सुमारे ४४ कोटी रुपये प्रति किलोमीटर एवढ्या खचार्चा असून हा खर्च महामार्गाच्या कामाच्या ५०० पट आहे. त्यामुळे १६८ कोटी रुपयांचे प्रस्तावीत सायकलिंग ट्रॅकचे काम रद्द करा,आणि मुंबईकरांचा पैसा अधिक चांगल्या कामांसाठी कोविड काळात जनतेच्या उपयोगासाठी वापरावा अशी मागणी अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्यांनी व्हिडिओ देखिल सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.



    जनतेच्या पैशाचा चुराडा करून १६८ कोटी रुपयांचे टेंडर काढणारा पालिकेतील सचिन वाझे कोण असा सवाल करून साटम यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारे जनतेच्या पैशाचा चुराडा कोणाच्या हट्टापाई किंवा कुणाला फायदा पोहचविण्यासाठी होत आहे, असा मुंबईकरांचा सवाल आहे. हे काम हे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात न घेता प्रस्तावीत करण्यात आला आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिका गेली २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करूनही मुंबई शहराला चांगले रस्ते देऊ शकले नाही. त्यामुळे पादचाऱ्यांकरिता अतिक्रमण विरहीत पदपथ व वाहनांसाठी चांगले रस्ते ही मुंबईची गरज आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

    Cycle track costs 500 times more than the highway in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस