वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे, येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल, असा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. Curative petition of Maratha reservation accepted by Supreme Court, hearing to be held on January 24
याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले…
माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षणा संदर्भात क्युरिटी पिटीशन स्वीकारलेली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे आज न्यायालयाने स्पष्ट केले. 12 वाजून 23 मिनिटाला याबाबत माननीय न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे. मला विश्वास आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे, असा दावा विनोद पाटील यांनी केला.
एकीकडे जरांगे पाटील यांचे आंदोलन तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. तसेच येत्या 24 जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Curative petition of Maratha reservation accepted by Supreme Court, hearing to be held on January 24
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडी समर्थक बुद्धिमत्तांची लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची भाषा; तर भाजपचे 35 कोटी मतांचे टार्गेट!!
- ”भारतात अल्पसंख्याक सुखी आहेत, लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव नाही”
- संसदेचे सत्र संपले, खासदारांचे निलंबनही रद्द; पण INDI आघाडीच्या नेत्यांची आजही आंदोलनाची “जिद्द”!!
- मोदी सरकारच्या प्रगत भारत संकल्प रथाला दाखवला जातोय “नागरिकांचा” विरोध; पण हा तर राष्ट्रवादीचा छुपा पॅटर्न!!