विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक जर माणसाला कळाला तर माणसाचेच नाही तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जीव जनावरांचे देखील आयुष्य सुरक्षित होईल. कालच कोल्हापूरमध्ये एका लहानग्याला अंधश्रद्धेपोटी आपला जीव गमवावा लागला होता. इथे माणूस माणसाला मारण्यासाठी घाबरत नाहीये तर मुक्या जनावरांची कोणाकडे न्याय मागावा?
Culmination of a distorted mentality was seen in takala area kolhapur
कोल्हापूरमधील टाकाळा परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर ऍसिड टाकून भाजण्याचा प्रकार काल कोल्हापुरात घडला आहे. तर मांजराच्या नुकत्याच जन्मलेल्या पिलांना गटारीत फेकण्यात आले होते. या घटनेची दखल प्राणीप्रेमी संस्थेने घेतली आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात या विकृत कृत्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ऍसिड फेकण्यात आलेल्या कुत्र्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पण पाठीवर आणि पोटावर ऍसिड ओतल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. बल्ब आणि फुग्यामध्ये ऍसिड भरून, फेकून ही इजा केली असावी असा संशय आहे.
Culmination of a distorted mentality was seen in takala area kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- ZP Election Result 2021: पालघरचे सर्व निकाल जाहीर; भाजपा तीन, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी
- देशात पहिल्यांदाच बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात पाचव्या दिवशी शिक्षा, नराधमाला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- शिरपूर पंचायत समितीची पोटनिवडणूक; भाजपचा सर्व सहाच्या सहा जागांवर विजय