विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sonu Sood गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक करून विडिओ व्हयरल झाला होता. एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा हा विडिओ होता. बैलाच्या जागी स्वतःला औताला जुंपणाऱ्या लातूरच्या या वृद्ध शेतकऱ्याला मदतीचा हात देऊ केला आहे. अभिनेता सोनू सूद याने शेतकऱ्याशी संपर्क साधत त्यांना बैलजोडी देण्याची ग्वाही दिली आहे. (We send bulls… Actor Sonu Sood assures help to an elderly farmer from Latur)
लातूर जिल्ह्यातील सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका 65 वर्षीय शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे स्वतःला त्याच्या जागी जुंपल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूद यांनी या शेतकऱ्याला बैलजोडी देण्याची घोषणा केली आहे. आप नंबर भेजिए, हम बैल भेजतें हैं, अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया सोनूने या प्रकरणी दिली.
सोनू सूदच्या मदतीनंतर स्थानिक प्रशासनानेही या शेतकरी दांपत्याला मदतीचा हात दिला आहे. कृषी विभागाने या शेतकऱ्याला सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची व ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कृषी विभागाने त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.अंबादास पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान व शेतीसाठी आवश्यक साधने मिळणार आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी दिली आहे.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
व्हायरल व्हिडिओ हा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावचा आहे. त्यात अंबादास पवार व त्यांच्या पत्नी शांताबाई पवार हे दोघे बैल नसल्यामुळे स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेतीची मशागत करताना दिसून येत आहेत. अंबादास पवार याविषयी बोलताना सांगतात, कुटुंबाचा चरितार्थ चालवताना आमच्यावर ही वेळ आली. सध्या मजुरीचा खर्च अमाप वाढला आहे. ट्रॅक्टरने पेरणी करणे परवडत नाही. आम्ही बैल बारदानाही घेऊ शकत नाही. शेतीत जेवढे पैसे लावले, त्याहून कमी पैसे हातात येतात. आम्ही बँकेकडून 40 हजारांचे कर्ज घेतले आहे. ते कर्ज आम्ही दरवर्षी भरतो. पुन्हा काढतो. आमचे गळ्याएवढे सोयाबीनचे पोते 4 हजार रुपयांना जाते. पण अवघ्या 25 किलोची सोयाबीनच्या बियाण्यांची बॅग 3 हजार घ्यावी लागते. खताचा भाव 1200 ते 1500 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतीतून जेवढे उत्पन्न निघते. तेवढ्यातच भागवावे लागते.
शांताबाई पवार यांनी यावेळी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली. आमच्याकडे 5 एकर सामायिक जमीन आहे. पण पाण्याची सोय नाही. आमचा मुलगा पुण्यात जाऊन पोट भरतो. मुलगा शिकला नाही म्हणून ही वेळ आली आहे. आमच्या नातवंडांवर तरी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जोपर्यंत हात-पाय चालत आहेत, तोपर्यंत आम्ही शेतात काम करतो. हे काम करण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा कोणता पर्यायही नाही. शासनाने आमचे कर्ज माफ करून खते व बियाण्यांची व्यवस्था करावी, असे त्या म्हणाल्या.
ctor Sonu Sood lends a helping hand to an elderly farmer
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसचे गमावलेले “राजकीय शहाणपण” परत येणार कधी??; संघावर बंदी घालायची काँग्रेस नेत्यांची खुमखुमी संपणार कधी??
- Delhi High Court : लोकसभा सभागृहात उडी घेऊन खासदारांना घाबरविणे देशविरोधी नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
- राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळी तरी कुठे लागला दिवा??
- ठाकरे बंधू आणि भाजपच्या धुमश्चक्रीत काँग्रेस पडली बाजूला; पवारांच्या राष्ट्रवादीलाही कुणी विचारेना!!