विशेष प्रतिनिधी
पुणे : आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.Cruise case witness Kiran Gosavi’s police custody increased
गोसावी याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 8 नोव्हेंबर पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.
पुण्यातील फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या किरण गोसावीची 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे न्यायालयाने त्याची अजून तीन दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे. तसेच आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या चार गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही गोसावी याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली केली होती. न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करुन किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबर पर्यंत वाढ केली आहे.
Cruise case witness Kiran Gosavi’s police custody increased
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न