• Download App
    Rajendra hagawne सुनेवर घाव, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज; हेच का ते "राष्ट्रवादीचे संस्कार"??

    सुनेवर घाव, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज; हेच का ते “राष्ट्रवादीचे संस्कार”??

    नाशिक : पुणे विभाग, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज, हे सगळे आज दिसल्याने हेच का ते “राष्ट्रवादीचे संस्कार”??, असे विचारायची वेळ आली Rajendra hagawne

    वैष्णवी हगवणेची हत्या करून फरार झालेला राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तोंडावर बुरखा घालून त्यांना न्यायालयात हजर केले, पण राजेंद्र, तुला पश्चाताप होतो का??, असे पत्रकारांनी विचारल्यावर राजेंद्र हगवणे माजात येऊन नकारार्थी हात हलवला.

    सुनेला मारून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही अत्यंत माजात थार गाडीने सगळीकडे फिरले. आपल्यावर राजकीय वरदहस्त असल्याने आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, अशा थाटात त्यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मटणावर ताव मारले. ते मित्रांकडे आणि वेगवेगळ्या फार्म हाऊसवर राहिले. महाराष्ट्रात उसळलेल्या संतापाने त्यांच्या माजा मध्ये काही फरक पडला नाही.

    या राजेंद्र हगवणे 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुळशीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी अजित पवारांना किंवा शरद पवारांना त्याच्या चाल, चलन आणि चारित्र्याविषयी कुठला संशय आला नव्हता. त्यांनी निवडणूक लढवायला कुठल्या व्यवसायातून पैसा आणला?? याबद्दल आणि त्याच्या वेगवेगळ्या व्यवहारांविषयी शंका आली नव्हती. शरद पवार आणि अजित पवार यांनी अशाच “अतिसंस्कारी” माणसांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पोसले. त्यांनी स्वाभिमानाच्या नावाखाली सगळ्या समाजात माज केले. सुप्रिया सुळे यांनी नेहमीच आई-वडिलांच्या संस्कारांच्या बाता मारल्या. पण याच सुप्रिया सुळे यांचे राजेंद्र हगवणेची मुलगी करिष्मा हगवणे हिच्याबरोबरचे फोटो व्हायरल झाले. त्यात त्यामध्ये सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे देखील दिसली. हीच करिष्मा हगवणे वैष्णवीच्या तोंडावर थुंकली होती. पवारांच्या “राष्ट्रवादी संस्काराची” ही सगळी माणसे काही काळापूर्वीच एकत्र “नांदत” होती. त्यावेळी अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांना या “राष्ट्रवादी संस्कारित” माणसांचे कारनामे दिसले नव्हते.

    अजितदादा माध्यमांवर चिडले

    पण वैष्णवी हगवणे प्रकरण बाहेर आल्यानंतर हे “राष्ट्रवादी संस्कारांचे” कारनामे सगळे समाजासमोर उघड्यावर यायचे राहिले नाहीत. पण माध्यमांनी हे सगळे कारनामे उघड करून अजित पवारांचे नाव राजेंद्र हगवणे बरोबर जोडले म्हणून अजित पवार माध्यमांवर चिडले. माध्यमांना अजित पवार शिवाय दुसरा काही उद्योग नाही म्हणून ते वाटेल त्या बातम्या देतात, असे ते म्हणाले. पण “राष्ट्रवादी संस्कारांविषयी” त्यांनी कुठे भाष्य केले नाही.

    माणसं सैतानासारखी एवढी कशी निर्दयी वागू शकतात?? या प्रकारचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीला मग तो कुणीही असो, त्याला कठोराली कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, अशी साळसूद प्रतिक्रिया सुप्रिया सुळे त्यांनी व्यक्त केली. पण वैष्णवीच्या तोंडावर थुंकणाऱ्या करिष्मा हगवणे बरोबर तुमचे फोटो आहेत, हेच का ते तुमचे “राष्ट्रवादी संस्कार”??, असा सवाल त्यांना कोणी विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तर द्यायचा प्रश्नच उद्भवला नाही.



    पोलिसांनी पत्रकार परिषद 2 मिनिटांत गुंडाळली

    राजेंद्र हगवणे याच्यावर कारवाई करू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाच जबाब असल्याचे अप्रत्यक्षपणे उघड झाले. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केली, अशी माहिती देण्यासाठी बावधन पोलिसांनी घेतलेली पत्रकार परिषद तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांनी अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळून टाकली. वरिष्ठांनी सूचना दिल्याप्रमाणे सर्व कायदेशीर कारवाई होत आहे. संबंधित केस “लॉजिकल एंड” पर्यंत नेऊन पोहोचवू, एवढेच निवेदन बावधन पोलिसांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर कुठलीही प्रश्नोत्तरे टाळून पोलीस तिथून निघून गेले.

    वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला पोलिसांनी अटक केली, तरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. त्यांना जेवणाचे डबे पोहोचविले असा आरोप वैष्णवीचे वडील आनंदा कस्पटे यांनी केला. या संदर्भात बावधन पोलिसांना या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले जाणे अपेक्षित होते. परंतु, पोलिसांनी अवघ्या दोन मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद गुंडाळल्याने आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रश्न पत्रकारांना विचारताच आला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पोलिसांवर किती आणि कसा दबाव होता आणि आहे हे मात्र उघडकीस आल्याशिवाय राहिले नाही.

    Cruelty of NCP leader Rajendra hagawne

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भारताचा चिकन नेक आवळायची बांगलादेशाची भाषा; पण भारतानेच “विशाल मन” दाखवायचा माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा सल्ला; स्वदेशावर अवसानघातकी “हल्ला”!!

    Vijay wadettiwar : विजय वडेट्टीवारांनी ड्रोनच्या किंमतीबाबत केलेल्या विधानावर दिलं स्पष्टीकरण

    चिकन नेकचा गळा आवळायला निघालेल्या मोहम्मद युनूसवर बांगलादेशात राजीनाम्याची वेळ; त्या उलट पूर्व भारतात मोदी + अदानी + अंबानींची investment meet!!