• Download App
    शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका,मग थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न तेलाची बाटलीच’ गिफ्ट!Criticism of Sharad Pawar in one language, then a gift of 'Navratna oil bottle' to Chandrakant Patil directly from NCP activist!

    शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका,मग थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न तेलाची बाटलीच’ गिफ्ट!

    पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे.Criticism of Sharad Pawar in one language, then a gift of ‘Navratna oil bottle’ to Chandrakant Patil directly from NCP activist!


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच कलगीतुरे रंगताना पहायला मिळत आहेत. त्यातच सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. मात्र या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे.

    संदीप काळे असे या कार्यकर्त्यांचे नाव आहे. यावर उत्तर देताना काळे याने म्हटले आहे की, आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का, बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमचं डोकं शांत नाही झालं तर, त्याचा इलाज मी स्वखर्चाने करतो, असा इशाराच या कार्यकर्त्याने दिला आहे.



    चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका

    सांगलीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी 60 वर तो गेला नाही, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती.

    चाकणकरांकडूनही चंद्रकांत पाटील यांचा समाचार

    चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही चंद्रकांत पाटील यांचा जोरदार समाचार घेतला. चंद्रकांत पाटील आपलं वय आहे, तेवढी त्यांची कारकीर्द आहे. आपण बोलताना जरा सांभाळून बोलायला हवं. मी तुम्हाला हे परत परत सांगतीय. राजकारणात एकेरी भाषेत बोलू नये, असं त्या म्हणाल्या.

    Criticism of Sharad Pawar in one language, then a gift of ‘Navratna oil bottle’ to Chandrakant Patil directly from NCP activist!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!