विशेष प्रतिनिधी
मुंबई : विशाळगडावर माजी खासदार संभाजीराजे यांनी दंगल घडवली, असा आरोप संभाजीराजे (sambhaji raje) छत्रपतींवर केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांच्या गाडीवर हल्ला झाला. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केला. सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झाला. Criticism of jitendra awhad on Sambhaji Raje
स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला. त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे. ते हिरवं आहे का??, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे चिडून स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या दिशेने आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने मांडली आहे. आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने केली होती.
राजर्षी शाहूंच्या विचारांच्या विसंगत संभाजींची भूमिका
मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला. गाडी थांबवायला सांगितली, त्यानंतर हा हल्ला केला. संभाजीराजेंची चूक होती. विशाळगडावर जे काही झालं, ते त्यांच्या आडून झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती. हे मी आज देखील सांगत आहे. राजर्षी शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारांचं रक्त होतं. त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतं. यांना आता संभाजीराजे म्हणता येणार नाही कारण शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजी मध्ये नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा केली. त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात रस्त्यावर येऊन निदर्शने केली.