विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं पण उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब आहे. त्यांची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. Criticism of Chandrashekhar Bawankule on uddhav thackeray
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही वचननामा जाहीह करण्यात आला. भाजप, शिंदे गटावर टीका करतानाचा उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांच्या याच जाहीरनाम्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे ट्विटमध्ये म्हणाले की, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो.
Criticism of Chandrashekhar Bawankule on uddhav thackeray
महत्वाच्या बातम्या
- Kamala Harris “या निवडणुकीचा निकाल तो नाही,जो…” पराभवानंतर कमला हॅरिसचा समर्थकांना संदेश
- Raj thackeray मला संधी द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही; अमरावतीतून राजगर्जना!!
- Mahavikas Aghadi : लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसचे नेते कोर्टात; पण महाविकास आघाडी सरकार महिलांना 3000 रुपये देणार!!
- Brampton : ‘ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत पोलिसांना होती सर्व माहिती ‘