• Download App
    डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित, आरोपींनी केले आरोप अमान्य |Crime registerd against five in Dabholkar murder case confirmed, allegations made by accused denied

    डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित, आरोपींनी केले आरोप अमान्य

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध अखेर आरोप निश्चित करण्यात आले. आरोपींनी न्यायालयाला गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले. येत्या ३० सप्टेंबर रोजी सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली जाणार आहेत.Crime registerd against five in Dabholkar murder case confirmed, allegations made by accused denied

    20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे सुनावणी झाली.



    डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोप निश्चित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अंदुरे, डॉ. तावडे, कळसकर हे तिघे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते. आरोपी पुनाळेकर आणि भावे प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते.

    केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी पुनाळेकर आणि भावे यांच्यावर पुरावे नष्ट करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

    कोरोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिला. आरोप निश्चिती झाली असून, गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा आरोपींकडे केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.सीबीआय तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले.

    Crime registerd against five in Dabholkar murder case confirmed, allegations made by accused denied

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?