येत्या काही दिवसांत प्रॉपर्टीच्या किमतीत मोठ वाढ होऊ शकते. रिअल इस्टेट बिल्डर्स बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) ने सिमेंट आणि स्टीलसह कच्च्या मालाच्या किंमती सतत वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. क्रेडाईने सांगितले की, बांधकामाच्या वाढलेल्या किमतीची भरपाई करण्यासाठी घराच्या किमती 10-15 टक्क्यांनी वाढू शकतात. Credai report Property prices may go up by 10 15 percent if construction material prices are not controlled
वृत्तसंस्था
मुंबई : येत्या काही दिवसांत प्रॉपर्टीच्या किमतीत मोठ वाढ होऊ शकते. रिअल इस्टेट बिल्डर्स बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) ने सिमेंट आणि स्टीलसह कच्च्या मालाच्या किंमती सतत वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. क्रेडाईने सांगितले की, बांधकामाच्या वाढलेल्या किमतीची भरपाई करण्यासाठी घराच्या किमती 10-15 टक्क्यांनी वाढू शकतात. कच्च्या मालाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यात करण्यात आली असून त्यासाठी जीएसटीमध्ये कपात करण्याची सूचना करण्यात आली आहे.
CREDAI या 13,000 हून अधिक विकासकांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेने सांगितले की, जानेवारी 2020 पासून बांधकाम कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याव्यतिरिक्त, असोसिएशनने म्हटले आहे की, लॉकडाऊन, कर्फ्यू आणि कामगारांच्या तुटवड्यामुळे बांधकामाला होत असलेल्या विलंबामुळे गेल्या 18 महिन्यांत बांधकाम खर्चात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
घरे 15 टक्क्यांपर्यंत महाग होतील
एका निवेदनात, CREDAI ने म्हटले आहे की, नजीकच्या भविष्यात कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या नाहीत, तर बांधकामाच्या वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी निवासी मालमत्तांच्या किमती 10-15 टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यात म्हटले आहे की, ही एक बहुआयामी समस्या आहे कारण बांधकाम खर्चात लक्षणीय वाढ झाली असली तरी RERA विक्री किमतीत वाढ करू देत नाही.
क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया म्हणाले की, “मागच्या एका वर्षात आम्ही कच्च्या मालाच्या किमतीत झपाट्याने वाढ पाहत आहोत आणि नजीकच्या भविष्यात त्या कमी होण्याची किंवा स्थिर होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत वाढत्या किमतीचा भार बांधकाम व्यावसायिकांना पेलवणार नाही. क्रेडाईने सरकार आणि संबंधित मंत्रालयांना या समस्येकडे लक्ष देण्याची आणि किमतीतील वाढीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
Credai report Property prices may go up by 10 15 percent if construction material prices are not controlled
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली