श्री क्षेत्र गहिनीनाथ गडापासून पंढरपूरपर्यंत मार्गाच्या आराखड्याला राज्य शासनाने सुरुवात केली
विशेष प्रतिनिधी
बीड : श्री संत वामनभाऊ महाराज यांचा 48 वा पुण्यस्मरण महोत्सवादिनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी महंत विठ्ठल महाराज, मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.Creating a Faithful Society Living for Humanity Through Warkari Tradition Devendra Fadnavis
यावेळी श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या मागील पुण्यतिथीदिनी दिलेल्या शब्दानुसार तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील 22.96 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. या अंतर्गत बहुउद्देशीय सभागृहासाठी (कीर्तन मंडप) 12.15 कोटी, भक्त निवासासाठी 7.33 कोटी, स्वागत कमानीसाठी 1 कोटी, प्रसादालयासाठी 1000 क्षमता व महंत निवासासाठी 1.40 कोटी तर ध्यान मंदिरासाठी (विश्वस्त कार्यालय) 1.08 कोटींची तरतूद राज्य शासनाने केली. या सोबतच नवीन अर्थसंकल्पामध्ये आणखी 25 कोटींची तरतूद करून श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा आराखडा पूर्ण करण्याचे फडणवीसांनी आश्वासन दिले.
वारकरी परंपरेतील संतांनी या देशामध्ये भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून जाती धर्माच्या पलीकडे जनसामान्यांना जगण्याचा मंत्र दिला. वारकरी परंपरेच्या माध्यमातून मानवतेसाठी जगणार्या सश्रद्ध समाजाची निर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. यासाठी वारीचे महत्त्व मोठे आहे. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडापासून पंढरपूरपर्यंत मार्गाच्या आराखड्याला राज्य शासनाने सुरुवात केली असून येत्या काळात अडथळामुक्त वारी संपन्न होणार. यासोबतच पंढरीला गहिनीनाथ गडाची स्वतःची जागा मिळविण्याचा विश्वास देखील यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला.
!!विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा, कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचें तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे…!! वारकरी संप्रदायाने दिलेला हा मंत्र जपून एकदिलाने एकत्रित राहण्याचा संदेश देखील यावेळी दिला.
Creating a Faithful Society Living for Humanity Through Warkari Tradition Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- अधीर रंजन यांचा पलटवार- ममता दीदी भाजपला घाबरतात, म्हणूनच त्या त्यांची भाषा बोलतात
- इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला ‘बेकायदेशीर विवाह’ प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा
- पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला राजीनामा
- अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “सेक्युलर” पर्याय निवडून मुंबईतल्या काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांचा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याचा डाव!!