प्रतिनिधी
मुंबई : कोरोना नंतर गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मुंबई – पुणे महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत, गणेशोत्सवात जाणा-यांना एक विशेष स्वतंत्र मार्गिका ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. Create a separate lane for the vehicles of Ganesha devotees
मुख्यमंत्र्यांनी रविवारी खालापूर टोलनाक्याला भेट दिली. तेथे त्यांनी खालापूर टोल नाका परिसरात असेलल्या अधिकाऱ्यांशी आणि पोलिसांसोबत चर्चा केली. या चर्चेत त्यांनी गणेशोत्सवासाठी जाणा-या वाहनांना टोलनाक्यावर स्वतंत्र मार्गिका करण्याबाबत सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई- गोवा महामार्गाची झालेली चाळण पाहता, अनेक जण कोकणात जाण्यासाठीही मुंबई- पुणे द्रुतगती मार्गालाच पसंती देत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आधीच खबरदारी पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कायमस्वरूपी तोडगा काढावा
शनिवारी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर या मार्गावरील दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अमृतांजन पुलाजवळ सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी पाहता, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशीही मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. दरम्यान, शनिवारी एका दिवसासाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीदेखील देण्यात आली होती.
Create a separate lane for the vehicles of Ganesha devotees
महत्वाच्या बातम्या
- Sonali Phogat : सोनाली फोगट हत्येप्रकरणी पाचवी अटक, हे चारही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात
- Karnataka Hijab Case : हिजाबप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, हायकोर्टाने सरकारचा बंदीचा आदेश ठेवला कायम
- गणेशोत्सव स्पेशल : “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात “मोदी एक्सप्रेस” कोकणाकडे रवाना!!
- काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर प्रश्न विचारले; फारूक अब्दुल्ला इंटरव्यूमध्ये चिडून निघून गेले!!