• Download App
    मोठा भाऊ - लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!! Cracks in MVA over big brotherly attitude of NCP

    मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!, अशी अवस्था आज महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीत काँग्रेस पेक्षा मोठा भाऊ झाली आहे. राष्ट्रवादीचे 54 तर, काँग्रेसचे 42 आमदार आहेत. शिवसेनेचे 56 आमदार होते. पण आता त्यांच्याकडे 14 आमदार उरले आहेत, असे वक्तव्य केले. Cracks in MVA over big brotherly attitude of NCP

    त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या चर्चेत ठिणगी पडली आणि आता त्याची आग भडकू पाहत आहे. अजितदादांच्या मोठा भावाच्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी त्यांना जास्त अहंकार करू नका, असा टोला आणला आहे, तर महाविकासाकडे प्रत्येक पक्षाची डीएनए टेस्ट करावे लागेल अशा शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांना टोचले आहे.

    कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर डोक्यात उत्साहाची हवा गेलेल्या महाविकास आघाडीत वज्रमूठ सभा घेण्यावर तर एकमत झाले, पण प्रत्यक्ष जागा वाटपाबाबत मात्र वक्तव्यांच्या ठिणग्या पडल्या आहेत.



    आमदारांच्या आकडेवारीचा अहवाला देऊन अजितदादा आणि त्यानंतर रोहित पवारांनी राष्ट्रवादीत मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले. मात्र नाना पटोले यांनी अजितदादांना काँग्रेसही कधीतरी मोठा भाऊ होता. पण आम्ही त्याचा अहंकार केला नाही. स्वतःच्या आकड्याचा अहंकार करायचं का नाही हा यांचा अधिकार आहे. त्यांनी ते ठरवावे. पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र भाजपला हरवायला उभे राहू, अशा शब्दात अजितदादांचा समाचार घेतला, तर संजय राऊत यांनी त्यांना डीएनए टेस्ट करून घेतली पाहिजे अशा शब्दात सुनावले.

    महाविकास आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा किती अवघड आहे हेच यातून दिसून आले. त्याचबरोबर मोठा भाऊ आणि लहान भाऊ या वक्तव्यातून महाविकास आघाडीचे नेते भाजप समोर आपले उमेदवार उभे करण्यापेक्षा एकमेकांच्याच समोर उभे करून एकमेकांच्या जागा खाण्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Cracks in MVA over big brotherly attitude of NCP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!