विशेष प्रतिनिधी
मुबंई : कोरोनाचा ज्वर जेव्हा एकदम पीकवर होता, त्यावेळी बऱ्याच लोकांना उपचाराअभावी आपला प्राण सोडावा लागला होता. कारण दवाखान्याचा खर्च पाहूनच गरिबाला छातीत धडकी भरत होती. ऑक्सिजन बेडचे अॅडव्हान्स बुकिंग देखील या काळात सुरू होते. ठराविक रक्कम भरल्याशिवाय कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेतले जायचे नाही. काही क्षण तर असे आलेले होते की गरिबाला जगण्याचा उपचार घेण्याचा हक्क नाही का? हा प्रश्न पडत होता. सरकारी दवाखान्यात फोन केले की बेड उपलब्ध नसायचा. असे एक ना अनेक वाईट अनुभव ह्या काळात अनुभवायला, ऐकायला मिळाले होते.
Covid Test: State Government fixes new rates for RTPCR test
नुकताच महाराष्ट्र सरकारने ह्या बाबतीत एक छोटेसे पाऊल उचलले आहे. कोरोणा झाला आहे किंवा नाही यासाठी करावी लागणारी आरटी पीसीआर या चाचणीचे रेट ठरवणारे शासनाने एक परिपत्रक जाहीर केले आहे. ह्यात ह्या चाचणी करण्यासाठी नव्या दरांची घोषणा केली आहे. तपासणीसाठी आवश्यक असणारे रीएजेंट्स, व्हीटीएम कीट्स, पीपीए कीट्स, आरएनए एक्सट्रक्शन किट हे माफक दरात उपलब्ध होणार आहेत.
मास्कचे दरदेखील आता कमी झाले आहे.
राज्यातील सर्व खासगी प्रयोगशाळांसाठी कोविड- १९ चाचणीचे दर सर्व करांसह आता निश्चित करण्यात आले आहेत. हे दर खालीलप्रमाणे आहेत,
१. तपासणी केंद्रा वर एकत्रित तपासणी नमुने चाचणीसाठी घेणे, आवश्यक सामग्रीसह दर – ३५० रुपये
२. विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, कोविड चाचणी बुथ यासाठी सर्व साहित्यासह दर – ५०० रुपये
३. रुग्णाच्या घरात जाऊन नमुने घेणे, येण्याजाण्याचा, नमुन्यांना घेऊन जाण्याचा खर्च, अहवालासाठी लागणारं साहित्य तसंच इतर आवश्यक सामग्रीसह खर्च – ७०० रुपये
ELISA for SARS Covid-2 Antibodies Test
१.रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – २०० रुपये
२. तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास – २५० रुपये
३. रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास – ३५० रुपये
CLIA for SARS Covid-2 Antibodies Test
१.रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – ३०० रुपये
२. तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास – ४०० रुपये
३. रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास – ५०० रुपये
Rapid Antigen Test for SARS Covid-2
१.रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – १०० रुपये
२. तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास – १५० रुपये
३. रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास – २५० रुपये
CB-NAAT /TRUENAT
रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास – १२०० रुपये
Covid Test: State Government fixes new rates for RTPCR test
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टी सोडण्यासाठी मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची ऑफर; खासदार भगवंत मान यांचा खळबळजनक दावा!!
- पंचगंगा नदीमध्ये फेस आढळून आला
- शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा
- शिक्षकांच्या मोर्चावर लाठी चार्ज : उत्तर प्रदेशमधील ६९००० सहाय्यक शिक्षकांच्या शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कॅडल मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज