विशेष प्रतिनिधी
पुणे -रुग्णालयात दाखल असलेल्या एका काेविड रुग्णाला टाॅस्लीझुमब हे इंजेक्शन देणे गरजेचे असल्याने ते मिळवून देताे असे सांगुन, एका इसमाची ५० हजार रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सशांक नितिन दिवेकर (वय-४२,रा.भवानी पेठ,पुणे) यांनी खडक पाेलीस ठाण्यात नयनसिंग चाैहान नावाचे व्यक्ती विराेधात तक्रार दाखल केली आहे. COVID patient need the tesllazumb injection but unkonown person cheated 50 thousand rupees
सशांक दिवेकर हे खासगी कंपनीत नाेकरी करत असून त्यांचे वडील हे नाेव्हेंबर २०२१ मध्ये पुना हाॅस्पीटल याठिकाणी काेविड झाल्याने अंतर रुग्ण म्हणून त्यांना दाखल करण्यात आले हाेते. त्यांना टाॅस्लीझुमब हे इंजेक्शन देणे गरजेचे असल्याने सदरचे इंजेक्शन कुठे भेटत नव्हते. त्यावेळी त्यांनी पुना हाॅस्पिटलच्या आयसीयु सेंटर मध्ये असलेला एका माेबाईल क्रमांकावरुन त्यांना सिपला कंपनी मार्केटिंग म्हणून एक नंबर मिळून आला.
सदर माेबाईल क्रमांकावर त्यांनी इंजेक्शन मिळविण्यासाठी फाेन केला असता त्यांना इंजेक्शनची किंमत ४९ हजार ७२५ रुपये सांगण्यात आली. त्याप्रमाणे त्यांनी आराेपी नयनसिंग चाैहान याचे बँक खात्यावर सदरची रक्कम पाठवली असता, आराेपीने तक्रारदार यांना इंजेक्शन पाठवले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरबाबत सिपला कंपनीत चाैकशी केली असता त्यांना नयनसिंग चाैहान नावाचा काेणताही व्यक्ती हा सिपला कंपनीत कामला नसल्याचे समजले.
त्यामुळे आराेपीने सिपला कंपनीचा मार्केटिंग हेड असल्याचे सांगुन त्यांची ५० हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सुरुवातीला दिवेकर यांनी सायबर पाेलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला, त्याची चाैकशी हाेऊन यासंर्दभात पाेलीस ठाण्याकडे अर्ज वर्ग करण्यात आला.खडक पाेलीसांनी याबाबत चाैकशी करुन आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
COVID patient need the tesllazumb injection but unkonown person cheated 50 thousand rupees
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!
- Devendra Fadanavis : मशिदींवरचे भोंगे उतरवताना हातभर फाटली आणि म्हणे “यांनी” बाबरी मशीद पाडली!!; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!!
- AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!