• Download App
    अडसूळ यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार, सिटी को- ऑपरेटिव्ह बॅँकेतील ९८० कोटी रुपयांचा गैरव्यवहारCourt refuses to protect Adsull from arrest, Rs 980 crore embezzlement in Citi Co-operative Bank

    अडसूळ यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार, सिटी को- ऑपरेटिव्ह बॅँकेतील ९८० कोटी रुपयांचा गैरव्यवहार

    खासदार भावना गवळी यांच्यानंतर शिवसेनेचा विदर्भातील आणखी एक नेता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला.Court refuses to protect Adsull from arrest, Rs 980 crore embezzlement in Citi Co-operative Bank


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : खासदार भावना गवळी यांच्यानंतर शिवसेनेचा विदर्भातील आणखी एक नेता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यावर सिटी को-आॅपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

    आपल्याला याप्रकरणी अटक होऊ शकते, या भीतीने अडसूळ यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यापूर्वी अडसूळ यांनी ईडीने केलेल्या कारवाईला आव्हान देणारी तसेच ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत त्यांना अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.

    सोमवारच्या सुनावणीत विशेष न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या जामीन अर्जावर २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी अडसूळ त्या बँकेचे अध्यक्ष होते. याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने अडसूळ यांच्यावर गुन्हा नोंदविला.



    सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांच्यावर आमदार रवी राणा यांनी तक्रार केली होती. मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी ईडीकडे तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे.

    या प्रकरणी काही दिवसांपूर्वी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे पडले होते. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप खासदार अडसूळ आणि त्यांच्या मुलाने फेटाळून लावले आहेत.

    Court refuses to protect Adsull from arrest, Rs 980 crore embezzlement in Citi Co-operative Bank

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!