वृत्तसंस्था
अमरावती – अमरावतीत खाजगी बाजारात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. कापसाला मिळालेला जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर ठरला आहे.Cotton in Amravati Record price of Rs 9000
विदर्भातील प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. यावर्षी अती पावसाने तसेच काही भागात बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यासोबतच संपूर्ण राज्यात देखील कापूस उत्पादक असलेले इतर राज्य आणि ज्या काही देशांमध्ये कापूस उत्पादन घेतले जाते त्या सर्व ठिकाणी कापसाचे उत्पादन घटले आहे.
त्यामुळेच यंदा कापसाला विक्रमी भाव मिळत आहे. या भाव वाढीवर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत असून भाव जर राहिला तर शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची गरज पडणार नाही व आत्महत्यात सुद्धा घट होईल, असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले तर आगामी काळात आणखी १० हजारच्यावर भाव जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- अमरावतीमध्ये कापसाला ९५०० रुपये विक्रमी भाव
- कापसाला आजपर्यंतचा सर्वाधिक दर मिळाला
- नववर्षात पहिल्या दिवशी शेतकाऱ्याना लॉटरी
- शेतकरी सुखावले, आताम्हत्या कमी होतील
- कापसाचे दर १० हजार प्रति क्विंल्टल जाणार ?