• Download App
    इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर काव्यात्मक हल्लाबोल|Corruption here, destruction there, don't blow the conch shell, Devendra Fadnavis's poetic attack on Mahavikas front

    इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर काव्यात्मक हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : प्रकाश पेरा अपुल्या भवती,दिवा दिव्याने पेटतसे
    इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका

    या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कवितेचा संदर्भ देत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.दारुवरील कर कमी करणे, एसटी कर्मचारी आंदोलन , परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकरी मदत आणि शेतकºयांच्या आत्महत्या, मराठवाडा आणि विदर्भावरील अन्याय,Corruption here, destruction there, don’t blow the conch shell, Devendra Fadnavis’s poetic attack on Mahavikas front

    अशा अनेक मुद्द्यांवर फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना फडणवीस बोलत होते.



    देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना कवी नारायण सुर्वे आणि कुरुमाग्रजांच्या कवितांचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात भयाण स्थिती आहे. राज्याला प्रशासक दिसत नाही. आगी लागतात, इथं कुंपनच शेत खात आहे.

    मुख्यमंत्री हे तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी ही सदिच्छा. आज राज्याची अवस्था पाहून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही प्रचंड वेदना होत असतील. स्वातंत्र्यदेवीची विनवणी आज इतकी खरी ठरेल, याची कल्पनाही कुणी केली नसेल.

    राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. मात्र, दारुवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी एका कवितेचा आधार घेत राज्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले,

    सूर्यकुलाचा दिव्य वारसा
    प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
    काळोखाचे करून पूजन
    घुबडांचे व्रत करू नका
    जनसेवेस्तव असे कचेरी,
    ती डाकूंची नसे गुहा..
    मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका!
    सत्ता तारक सुधा असे,
    पण सुराही मादक सहज बने.
    करीन मंदिरी,
    मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका
    कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले,
    हे हात माझे सर्वस्व,
    दारिद्रयाकडे गहाणच राहिले
    कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

    मुंबईसह महाराष्ट्र, बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र, हीच आमची भूमिका आहे. पण विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. वैधानिक विकास मंडळ काढून घेण्याचे पाप या सरकारनं केलं. ही कवच-कुंडले तुम्ही काढून घेतली.

    आता विदर्भ-मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरु आहे. वीज सवलत बंद केली. नानाजी देशमुख कृषि समृद्धी योजनेचे निकष बदलून अन्याय केला. बळीराजा सिंचन अभियान मंजूर करवून आणले, आज सिंचनाची काम बंद होत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

    पीकविम्याचे पैसे मिळत होते, तेव्हा मोर्चे काढले गेले. आज मिळत नाहीत तर मोर्चे काढणारे गप्प आहेत. आमच्या काळात विमा हप्त्याच्या 112 टक्के पैसे मिळत होते. आज फक्त 20 टक्के मिळत असल्याची टीकाही त्यांनी केलीय. पंतप्रधान मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या 8 हजार 916 कोटींपैकी 793 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना या सरकारने दिलेच नाहीत. रोज कशाला खोटे बोलता, असा आरोप फडणवीस यांनी केला.

    Corruption here, destruction there, don’t blow the conch shell, Devendra Fadnavis’s poetic attack on Mahavikas front

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस