वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लोक एकीकडे शहराकडून गावाकडे जात आहेत. दुसरीकडे गावातील लोक चक्क शेतात राहण्यासाठी जात आहेत. सुरक्षित राहण्यासाठी ही धडपड आणखी किती सुरु राहणार हे मात्र काळच ठरवणार आहे. Corona’s threat to villagers
पुणे आणि मुंबईसारख्या शहरात औषधांचा, बेडचा ऑक्सिजन बेडचा तुटवडा झाल्यामुळे अनेक मंडळींनी सुरक्षित असलेली अन्य शहरे निवडली आणि तेथे जाण्याचा पर्याय निवडला. राज्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे गावातून शहरात गेलेली मंडळी गावाकडे परतू लागली. शहरातून गावाकडे येणारे पाहुणे आणि त्यांची होणारी गर्दी पाहता गावकऱ्यांनी चक्क शेतात राहण्याचा पर्याय निवडला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
गावापासून दूर राहणंच चांगलं
पूर्वी साथीचे आजार अनेकदा येत असत. तेव्हा ग्रामस्थ शेतातच राहत असत. प्लेगची साथ आली आणि गावात माणसं मरू लागली. तेव्हा गावातले उंदरांनी भरलेले घर सोडून लोकांनी शेतात राहायला सुरवात केली होती. कोरोनामुळे आता तशी धास्ती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी शेताची वाट धरली असून बस्तान तेथे मांडल आहे.
उन्हाळी कामांना सुरुवात
कोरोनाच्या भीतीने शेतात बिऱ्हाड हलविलेल्या महिलांनी कुरडया, पापड्या, पापड, लोणची, शेवया, असे पदार्थ घरोघरी बनवायला घेतलेत. शिवाय पुरुष मंडळी आणि लहान मुले या बांधावरून त्या बांधावर चकरा मारणे. झाडाखाली पडी मारणे, झाडावरील मधाचं पोळं काढणं, विहिरीत तासंतास पोहत बसणे असे उद्योग पुरुष आणि मुले करीत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन
शेतात जाऊन राहिल्यामुळे येथे गावकऱ्यांचा कोणाशीही संबंध येत नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगतंतोतंत पाळलं जात. शेतातील झाडाच्या गार सावलीत मस्तपैकी बाजल टाकून सेल्फ क्वारंटाईनची मजा वेगळी. रोजगाराच्या निमित्ताने शहरात गेलेल्यानी गावाची कास धरली आहे. दुसरीकडे ग्रामस्थांनी गावापेक्षा शेतच बरे म्हणत शेतात राहणे पसंद केले आहे.