विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग पाहता जानेवारी तिसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या 2 लाख केसेस असतील, असा अंदाज आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. यासंदभार्तील एक सविस्तर पत्र आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यां ना पाठवले आहे. अगदी एक टक्काही रुग्णांचा मृत्यू झाला तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठी असेल असेही त्यांनी म्हटले आहे.Corona’s over two lakh patients in third week of January, Health Secretary’s letter to District Collector to take precaution against third wave
प्रदीप व्यास यांनी या पत्रात म्हटले आहे की , राज्यातील कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांची वाढती संख्या आपणा सर्वांना माहीत आहे. ज्याप्रकारे नवीन प्रकरणे वाढत आहेत, ती पाहता जानेवारी २०२२ च्या तिसºया आठवड्यापर्यंत आपल्याकडे सुमारे २ लाख सक्रिय कोविड प्रकरणे असतील अशी अपेक्षा आहे.
यापैकी काहींना हॉस्पिटलायझेशनची गरज भासल्यास या संख्येचं नियोजन करण्याची स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की सोशल मीडिया/प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे तुम्ही असं समजून नका की ओमिक्रॉन हा सौम्य आजार आहे. आपण तर्कशुद्ध आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
संपूर्ण जीनोमिक सिक्वेन्सिंगचे रिझल्ट्स असे दाखवतात की अद्यापही 70% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये डेल्टा प्रकार आहे असे सांगून व्यास यांनी म्हटले आहे की हा आकडा जिल्ह्यानुसार बदलेल. लसीकरण न केलेल्या व्यक्तींमध्ये सध्याच्या लाटेतही कोविड रोग गंभीर असल्याचे अभ्यास सांगतो.
कृपया लक्षात ठेवा की, सध्याच्या लहरीमध्ये लसीकरण न झालेल्या व्यक्तींना मार्च ते मे 2021 च्या दुसऱ्या लाटेइतकाच धोका आहे. तिस?्या लाटेत कोविड संसगार्ची संख्या खूप मोठी असू शकते. जर 1% मृत्यूचे प्रमाण गृहीत धरलं आणि तिसऱ्या लाटेत 80 लाख कोविड प्रकरणे मानली तर 80,000 मृत्यू होऊ शकतात.
त्यामुळे तिसरी कोविडची लाट ही सौम्य आहे आणि प्राणघातक नाही, अशी समजूत करुन घेऊ नका. ज्यांना लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे त्यांच्यासाठी हे तितकेच घातक आहे. त्यामुळे कृपया लसीकरणाचे कव्हरेज सुधारा आणि जीव वाचवा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
Corona’s over two lakh patients in third week of January, Health Secretary’s letter to District Collector to take precaution against third wave
महत्त्वाच्या बातम्या
- GST Council Meeting : नववर्षापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा, कपड्यांवर जीएसटीचे दर तूर्तास वाढणार नाहीत
- 2021ची वर्षाअखेर गाजतेय जुमला अवॉर्ड सेरिमनीने!!; And the Award goes to जुमला फकीर…!!
- मोठी बातमी : रशियाचा स्पाय सॅटेलाइट अवकाशात झाला अनियंत्रित, लवकरच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- Income Tax Return : ITRची मुदत वाढवण्यास अर्थमंत्रालयाचा नकार, कोणत्याही परिस्थितीत 12 वाजेपर्यंत दाखल करा!