विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट ही एप्रिलच्या मध्यावधीत शिखर गाठणार असून मेच्या अखेरीपासून हा संसर्ग कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संशोधकांनी एका गणितीय आराखड्याच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. आताच्या लाटेत सर्वप्रथम पंजाबमध्ये संसर्ग वाढेल आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात याचा उद्रेक पाहायला मिळेल असे संशोधकांचे म्हणणे आहे. या आराखड्याला त्यांनी सूत्र असे नाव दिले आहे. Corona will peak in Maharashtra mid april
आयआयटी कानपूरमधील संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी सद्यस्थितीमध्ये कोरोनाच्या स्थितीला हीच गणितीय फुटपट्टी लावून नव्याने काही अंदाज वर्तविले आहेत. सध्याचा देशभर पसरत चाललेला संसर्ग हा एप्रिलच्या मध्यावधीत शिखरस्थानी पोचेल असा त्यांचा कयास आहे.
मेच्या अखेरपासून देशातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होऊ लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
याआधी देशामध्ये संसर्गाची पहिली लाट आली होती तेव्हा तिच्याबाबत अंदाज वर्तविण्यासाठी याच आराखड्याचा आधार घेण्यात आला होता. त्यावेळी संशोधकांनी ऑगस्टमध्ये वाढलेला संसर्ग हा सप्टेंबरमध्ये शिखरस्थानी पोचेल आणि २०२१ च्या फेब्रुवारीपासून तो ओसरायला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविला होता.
हरियानातील अशोका विद्यापीठातील संशोधक गौतम मेनन यांनी वेगळ्या आराखड्याचा वापर केला आहे. त्यांच्या मते हा संसर्ग एप्रिल किंवा मेच्या मध्यावधीत शिखरस्थानी पोचू शकतो.
Corona will peak in Maharashtra mid april
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांच्या EC वरील आरोपांवर पीएम मोदी म्हणाले, प्लेयरने अंपायरवर टीका केली की समजा त्यांचा खेळ संपलाय!
- ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीमुळे 7 जण दगावले, 23 गंभीर आजारी, आरोग्य नियामकांची माहिती
- कोरोना संक्रमित फारुख अब्दुल्ला रुग्णालयात दाखल, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली माहिती
- IPL 2021 : आयपीएलवर कोरोनाचे सावट, वानखेडे स्टेडियमचे 8 ग्राउंड्समन कोरोना पॉझिटिव्ह
- Corona Outbreak : ब्राझीलमध्ये मृतदेह पुरण्यासाठी कमी पडतेय जागा, कबरी रिकाम्या करून दफनविधी