• Download App
    सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख ऊसतोड मजुरांना दिली जाणार कोरोना लस ; निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली माहिती|Corona vaccine to be given to 1.5 lakh sugarcane workers in Solapur district; . Resident Deputy Collector Shama Pawar gave the information

    सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख ऊसतोड मजुरांना दिली जाणार कोरोना लस ; निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली माहिती

    संबंधित मजुरांकडील कागदपत्रांची पडताळणी करून हे डोस देण्यात येतील.पहिले आणि दुसरे असे दोन्ही डोस दिले दिले जातील.Corona vaccine to be given to 1.5 lakh sugarcane workers in Solapur district; . Resident Deputy Collector Shama Pawar gave the information


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.शहर, जिल्ह्यात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.आता जिल्ह्यात आलेल्या ऊस तोड मजुरांना लस देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी आरोग्य विभाग, साखर कारखानदार यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात त्यांनी यासंबंधीची सूचना दिली.

    ‘जिल्ह्यात ऊसतोडीसाठी आलेल्या परजिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याची जबाबदारी संबंधित साखर कारखाना आणि आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे.



    येत्या १५ दिवसांत हे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.संबंधित मजुरांकडील कागदपत्रांची पडताळणी करून हे डोस देण्यात येतील.पहिले आणि दुसरे असे दोन्ही डोस दिले दिले जातील.”, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

    तसेच आरोग्य विभागाकडून मजुरांची संख्या पाहून प्रतिदिन लस किती देणार याचे नियोजन करावे, तर साखर कारखान्यांनी लसीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शमा सूचना पवार यांनी दिल्या.

    Corona vaccine to be given to 1.5 lakh sugarcane workers in Solapur district; . Resident Deputy Collector Shama Pawar gave the information

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस