Vaccine Registration : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अॅपवर नोंदणी सुरू होईल. आजपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील. Corona Vaccine Registration starting From 28th April, Know How To register Yourself on Cowin App
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Corona Vaccination Registration : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अॅपवर नोंदणी सुरू होईल. आजपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील.
28 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजेपासून रजिस्ट्रेशन
कोविन प्लॅटफॉर्म तसेच आरोग्य सेतू अॅपवर 28 एप्रिलपासून लसीकरणासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहे. याशिवाय ही नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही. कोविन पोर्टल https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आज संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू होईल.
स्पॉट रजिस्ट्रेशन कुणासाठी?
45 वर्षांहुन जास्त वयाच्या व्यक्तींना स्पॉट रजिस्ट्रेशन म्हणजेच लसीकरण केंद्रावर स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा पहिल्याप्रमाणेच सुरू राहील. परंतु 18 ते 45 वर्षांदरम्यान प्रत्येकासाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. 18 से 45 वर्षे वयोगटातील लोकसंख्या मोठी आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी रिजिस्ट्रेशन सक्तीचे करण्यात आले आहे.
कसे कराल रजिस्ट्रेशन?
सरकारतर्फे पीआयबीने रजिस्ट्रेशनची प्रॉसेस सांगितली आहे. कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन प्रॉसेस पूर्वीप्रमाणेच आहे. तुम्हाला कोविन पोर्टल (https://selfregistration.cowin.gov.in/)
वर किंवा आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून लसीसाठी नोंदणी करावी लागेल.
अशी आहे पूर्ण प्रॉसेस…
- https://selfregistration.cowin.gov.in पोर्टलवर रजिस्ट्रेशनचे पर्याय आहेत.
- येथे तुम्हाला आपला मोबाइल क्रमांक नोंदवावा लागेल. गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
- तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपीचा मेसेज येईल. हा ओटीपी 180 सेकंदांत टाकावा लागेल.
- मग सबमिट करताच नवे पेज ओपन होईल. येथे तुम्हाला आपला तपशील भरायचा आहे.
- फोटो ओळखपत्रासाठी आधार कार्डशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि मतदार कार्डाचाही पर्याय आहे.
- कोणताही एक पर्याय निवडून आपला आयडी नंबर टाकावा.
- यानंतर आपले नाव, लिंग आणि जन्मतिथी टाकावी लागेल.
- यानंतर जवळचे कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर निवडण्याचा पर्याय येईल.
- सेंटर निवडल्यानंतर तुम्ही आपल्या सुविधेनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.
- जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा जाऊन व्हॅक्सिन घ्या.
खासगी कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना लस देऊ शकतील
मुंबईसहित देशातील अनेक शहरांत कॉर्पोरेट क्षेत्रातर्फे अशी मागणी करण्यात आलेली आहे. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयातील डॉ. हेमंत ठक्कर यांच्या मते, आधि उत्पादन आणि वितरणावर सरकारचे पूर्ण नियंत्रण होते. परंतु आता यात सूट देण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, लस उत्पादक कंपन्यांना लसीच्या उत्पादनातील 50 टक्के केंद्र सरकारला देतील, उर्वरित 50 टक्के ते बाजारात विकू शकतात. यामुळे आता राज्य सरकारेसुद्धा कंपन्यांकडे थेट मागणी नोंदवू शकतात. तसेच खासगी कंपन्याही नर्सिंग होम अथवा खासगी रुग्णालयांच्या मदतीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण अभियान राबवू शकतात.
दरम्यान, लसीकरणासाठी 45 वर्षांहून जास्त वयाच्या हायरिस्क झोनमधील व्यक्तींना लस दिली जात होती. दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपेक्षा जास्त सर्वांना लस देण्यात येऊ लागली. आणि आता एक मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षे वयापेक्षा मोठ्या सर्वांना लस घेता येणार आहे.
Corona Vaccine Registration starting From 28th April, Know How To register Yourself on Cowin App
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु
- ऑक्सिजन निर्मिती ही ‘राष्ट्रीय गरज’, सर्वोच्च न्यायालयाचा स्टरलाइटला हिरवा कंदील
- आमने-सामने : रेमडेसिविर वरून ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले खडे बोल तर फडणवीसांनी वस्तुस्थिती समोर ठेवत केला गैरसमज दुर
- Maharashtra Lockdown : लॅाकडाऊन वाढणार का?; राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतील निर्णयाकडे जनतेचे लक्ष
- आरोग्यमंत्र्यांना लसीकरण मोहिमेची चिंता, १२ कोटी डोसची गरज , आतापर्यंत दीड कोटी नागरिकांचं लसीकरण