• Download App
    CORONA UPDATE : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह ; सोशल मीडियावर दिली माहिती । CORONA UPDATE: BJP leader Radhakrishna Vikhe Patil corona positive; Information given on social media

    CORONA UPDATE : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह ; सोशल मीडियावर दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते. CORONA UPDATE: BJP leader Radhakrishna Vikhe Patil corona positive; Information given on social media

    काय आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं ट्विट?

    आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझीटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हिड टेस्ट करावी आणि काळजी घ्यावी. असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते. याआधी राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना कोरोना झाला आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाला. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्या देखील हिवाळी अधिवेशनात हजर होत्या.

    CORONA UPDATE : BJP leader Radhakrishna Vikhe Patil corona positive; Information given on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस