• Download App
    युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वॅब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला अखेर १० वर्षाची शिक्षा । Corona swab of the girl's genitals Lab technician finally sentenced to 10 years

    युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वॅब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला अखेर १० वर्षाची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वॅब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. Corona swab of the girl’s genitals Lab technician finally sentenced to 10 years

    संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी ही घटना अमरावती शहरात २८जुलै २०२० रोजी घडली. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ही आल्याचे सांगून पुन्हा एकदा युवतीच्या गुप्तांगातून स्वाब घेण्यात आला होता. त्यामुळे मोदी हॉस्पिटलचा लॅब टेक्निशियन अलंकेश अशोक देशमुख या आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने १२ साक्षीदाराचे जबाब घेतले.



    यात जिल्हा न्यायालयाने १५ महिन्यानंतर यात निकाल देत आरोपी देशमुख याला १० वर्ष सक्षम कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला आहे, सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली.बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये या तरुणीचा विनयभंग झाल्या नंतर भाजपच्या वतीने आरोपीवर तातडीने कारवाई व शिक्षा व्हावी, यासाठी आंदोलन करण्यात आले होते,भाजप या अत्याचारग्रस्त तरुणीच्या मागे ठाम उभा होता व राहील,त्यामुळे या निकालावर भाजपने समाधान व्यक्त केले.

    Corona swab of the girl’s genitals Lab technician finally sentenced to 10 years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा