• Download App
    बनावट कोरोना अहवाल घेऊन प्रवास करणे भोवले; मुंबईहून दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांना रोखले । Corona report of 40 passengers bound for Dubai fake; Stopped at Mumbai Airport

    बनावट कोरोना अहवाल घेऊन प्रवास करणे भोवले; मुंबईहून दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांना रोखले

    वृत्तसंस्था

    मुंबई : बनावट कोरोना अहवाल घेऊन विमान प्रवास करण्याचा प्रयत्न प्रवाशांचा फसला आहे. या प्रकरणी मुंबईहून दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर केलेल्या ‘क्यू आर’ कोड तपासणीत ही बाब उघड झाली. त्यामुळे त्यांना प्रवास करण्यापासून रोखण्यात आले आहे. Corona report of 40 passengers bound for Dubai fake; Stopped at Mumbai Airport

    संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या प्रवाशांना दोनदा कोरोनाची चाचणी करावी लागते. पहिली ४८ तास आधी आणि दुसरी ६ तास आधी. सहा तासांत अहवाल मिळत नाही. त्यामुळे ४ हजार ५०० रुपये मोजून जलद चाचणी करावी लागते. तिचा अहवाल केवळ १३ मिनिटांत मिळतो.



    प्रवाशांच्या अहवालावरील ‘क्यू आर’ कोड तपासल्याशिवाय तो मंजूर होत नाही. १२ नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांचा जलद चाचणी अहवाल ‘क्यू आर’द्वारे तपासला. तेव्हा माहितीत तफावत दिसली. सुमारे ४० प्रवाशांचा अहवाल बनावट आल्याने त्यांना विमान प्रवास करण्यापासून रोखण्यात आले. शिवाय जलद आरटीपीसीआर चाचणीसाठी केली जाणारी पूर्वनोंदणी प्रक्रियाही थांबविली, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी  दिली.

    Corona report of 40 passengers bound for Dubai fake; Stopped at Mumbai Airport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंड कडूच!!; देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत तीव्र पडसाद!!

    Bawankule : मोदी-फडणवीसांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा; बावनकुळे यांचा सपकाळांवर पलटवार

    Relief for Farmers : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी