वृत्तसंस्था
कोल्हापूर : सातारा, बारामती, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यात कडक लॉकडाउन लागू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.Corona outbreak in Kolhapur district; Declared a ten-day strict lockdown
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रसार नियंत्रित व्हावा, यासाठी सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर निर्बंध आणखी कठोर केले.
मात्र, कोरोना संसर्ग कमी होण्याऐवजी रुग्ण वाढतच आहेत. राज्यातील रुग्णावाढीचा आलेख कायम असून, ५० ते ६० हजारांच्या दरम्यान रुग्णवाढ होत आहे. काही जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनकच आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारपासून (५ मे) पुढील १० दिवस कडकडीत टाळेबंदी पाळण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सहभागी झाले होते.