- शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
- संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई:शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. Corona infiltrates Sanjay Raut’s house
घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणं आढळून आली होती. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. यात चार जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चौघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यानं राहत्या घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
WATCH : बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का? संजय राऊत यांचा सुधीर मुनगंटीवार यांना सवाल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोना बाधित राजकीय व्यक्तींचीही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत १३ मंत्री आणि ७० हून अधिक आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच याबाबतची माहिती काल दिली होती. राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी दररोज कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येत असतात. आमदार आणि मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.
एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, केसी पाडवी यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन जाधव, पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वरुण देसाई, प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Corona infiltrates Sanjay Raut’s house
महत्त्वाच्या बातम्या
- BULLI BAI : जावेद अख्तर म्हणाले – ‘बुल्ली बाई अॅपच्या मास्टरमाईंडला माफ करा…
- नागपूरमध्येही पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद
- “छोट्या परदेश दौऱ्यावर” गेलेले राहुल गांधी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात परतणार
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी ; लक्षात आले BSF चे कार्यक्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत का वाढवले ते…??