Corona In Maharashtra : राज्यात कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातलेले असताना वारंवार खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरील निर्बंधांबरोबरच राज्य पातळीवरूनही नियमावलीच्या काटेकोर पालनाबाबत सातत्याने सांगितले जात आहे. परंतु तरीही याकडे सर्रास कानाडोळा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरूच आहे. आता बुलडाण्यातील एका गावात तेराव्याच्या गोड जेवणाचे निमंत्रण महागात पडले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 93 जणांना कोरोनाने गाठल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. Corona In Maharashtra 93 people Test Covid Positive After Feast In Buldhanas pota Village
विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : राज्यात कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातलेले असताना वारंवार खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरील निर्बंधांबरोबरच राज्य पातळीवरूनही नियमावलीच्या काटेकोर पालनाबाबत सातत्याने सांगितले जात आहे. परंतु तरीही याकडे सर्रास कानाडोळा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरूच आहे. आता बुलडाण्यातील एका गावात तेराव्याच्या गोड जेवणाचे निमंत्रण महागात पडले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 93 जणांना कोरोनाने गाठल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांना कोरोना नियमावलीबद्दलचा निष्काळजीपणा महागात पडल्याचे समोर आले आहे.
93 जणांना कोरोनाची लागण
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्ह्यातील पोटा गावात आतापर्यंत 93 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी 700 हून अधिक लोकसंख्या असलेले पोटा हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या तपासणी शिबिरात 15 ग्रामस्थ संसर्गित झाल्याचे आढळले. काही दिवसांनंतर घेण्यात आलेल्या दुसर्या शिबिरात 78 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यातील एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
संसर्ग होण्यापूर्वी पोटा गावातील काही जण तेराव्याच्या जेवणाला गेले होते, यावर अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु स्थानिकांच्या मते हाच कार्यक्रम कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरला आहे. खामगावमध्ये कोरोनाने ग्रस्त रुग्णाच्या निधनानंतर त्यांच्या मूळ गावी पोटामध्ये तेराव्याचे गोड जेवण आयोजित करण्यात आले होते. एका गावकऱ्याने सांगितले की, या जेवणाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यातीलच अनेकांना आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शिबिरे आयोजित करून अधिकाधिक लोकांची तपासणी केली जात आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, लक्षणे असलेले रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहेत आणि लक्षणे नसलेल्यांना घरी विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
Corona In Maharashtra 93 people Test Covid Positive After Feast In Buldhanas pota Village
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींचा अजब तर्क, म्हणाल्या- भाजपमुळे पश्चिम बंगालमध्ये वाढला कोरोनाचा संसर्ग
- संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ल्ड बँकेला काय सांगितले!
- Fact Check : मॉलबाहेर पोलिसाचा गोळीबार ,काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य ?
- धक्कादायक ! फेसबुक डेटा लीक ; 53 कोटी युजर्सचा डेटा ऑनलाईन विकला ; फेसबुकची सारवासारव ; महानगरे रडारवर
- CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा खुलासा; Internal assement नुसार निकाल लावणार, पण विद्यार्थी असमाधानी असल्यास परीक्षा देऊ शकणार