जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे.Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages
विशेष प्रतिनिधी
अहदनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता .आता या ६१ गावांमध्ये आणखी ८ गावांना लॉकडाऊन जाहीर केला आहे.त्यामुळे लॉकडाऊन असलेल्या गावांची संख्या आता ६९ झाली आहे.
या आठ गावांची पडली भर
या आठ गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी आणि शेवगावमधील वडुले बु. या गावांचा समावेश आहे.
लॉकडाऊनवर प्रतिक्रिया
जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे. तर, पारनेरसह अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीही निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages
महत्त्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टाने फटाके कंपन्यांना फटकारले, न्यायालय म्हणाले- ‘प्राणांचे मोल देऊन सण साजरा करण्याची परवानगी नाही!’
- काँग्रेस खासदार रजनी पाटील यांची केंद्र आणि योगी सरकारवर टीका , म्हणाल्या – “तालिबानी सरकार आणि उत्तर प्रदेमधील सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक”
- वार – पलटवार : राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपकडूनही टीकास्त्र, पात्रा म्हणाले, ‘गांधी कुटुंबाकडून लखीमपूर खीरी शोकांतिकेचा वापर बुडणारे जहाज वाचवण्यासाठी!’
- नागपुरमध्ये कट्टर समर्थक पराभूत, चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का ; काँग्रेसची ९ जागा जिंकून घोडदौड