• Download App
    कोरोना चाचणीसाठी तब्बल ४ हजार ५०० रुपये आकारले ; मुंबई विमानतळावर प्रवाशांची होतेय लूट|Corona charges Rs 4,500 for testing; Passengers being robbed at Mumbai airport

    कोरोना चाचणीसाठी तब्बल ४ हजार ५०० रुपये आकारले ; मुंबई विमानतळावर प्रवाशांची होतेय लूट

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर आल्यानंतर चाचणी केलेली नसल्यास दुबई, अबुधाबीसह लगतच्या देशांत जाणाऱ्या काही विमान कंपन्या प्रवाशांना विमानात चढण्याची परवानगी देत नाहीत.Corona charges Rs 4,500 for testing; Passengers being robbed at Mumbai airport


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाच्या नावे होणारी लूट अजून काहीथांबलेली नाही. याचच उदाहरण म्हणजे मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीसाठी तब्बल ४ हजार ५०० रुपये आकारले जात आहे.दरम्यान ही अतिरिक्त वसुली कधी थांबणार, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर आल्यानंतर चाचणी केलेली नसल्यास दुबई, अबुधाबीसह लगतच्या देशांत जाणाऱ्या काही विमान कंपन्या प्रवाशांना विमानात चढण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव ४ हजार ५०० रुपये मोजून चाचणी करावी लागत आहे.



    हवाई प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क वसुली

    खासगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर चाचणी केल्यास ६०० रुपये तर अँटिजनसाठी २५० ते ३०० रुपये लागतात.तसेच रेल्वे-बसस्थानके आणि काही सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या मोफत चाचण्या केल्या जातात. या सर्व सुविधा असताना हवाई प्रवाशांकडून ही अतिरिक्त शुल्क वसुली का केली जात आहे, असा सवाल काही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

    विमानतळावर या तीन प्रयोगशाळांना कोरोना चाचण्या करण्याची परवानगी

    मुंबई विमानतळावर सबर्बन डायग्नोस्टिक्स, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि. आणि लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड या तीन प्रयोगशाळांना कोरोना चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान त्यांची नियुक्ती आणि शुल्क आकारणीबाबत धोरणनिश्चिती शासनाने केलेली आहे.यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मुंबई विमानतळ प्रशासनाला नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई विमानतळाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.

    विमानतळावरील सद्यस्थिती

    विमानतळावर चाचणी केल्याशिवाय काही कंपन्या प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारत आहेत.दरम्यान विमानतळावर चाचण्यांसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे ६०० रुपयांचा देऊन ८ ते २२ तासांत चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. दुसरा पर्याय म्हणजे लगेचच अहवाल हवा असल्यास ४ हजार ५०० रुपये मोजावे लागतात.दरम्यान विमान सुटण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना ही बाब कळल्यानंतर प्रवाशांसमोर दुसरा पर्याय उरत नाही.

    Corona charges Rs 4,500 for testing; Passengers being robbed at Mumbai airport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस