• Download App
    महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप; राजकारणाचा त्यावर भडका; खोटे पडूनही नबाब मलिकांचा “नाक वर”चा पवित्रा, तर शिवसेना आली “महाराष्ट्रद्रोहावर!!” |corona and politics both on rampage in maharashtra

    महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप; राजकारणाचा त्यावर भडका; खोटे पडूनही नबाब मलिकांचा “नाक वर”चा पवित्रा, तर शिवसेना आली “महाराष्ट्रद्रोहावर!!”

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – इकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप होत असताना तिकडे राजकारणाचा त्याच्याही वर जाऊन भडका उडाला आहे. रेमडेसिवीर पुरवठ्यावरून खोटे ठरूनही ठाकरे – पवार सरकारचे मंत्री नबाब मलिक यांनी नाक वर असा पवित्रा घेत फडणवीस – दरेकर हे साठेबाजाला वाचवत असल्याचा आरोप केला आहे. फडणवीसांवर तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खालच्या भाषेत जाऊन टीका केली आहे… यावर मात्र, ठाकरे – पवार गप्प आहेत. corona and politics both on rampage in maharashtra

    ‘एका साठेबाजाला वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन विरोधी पक्षनेते आणि दोन आमदार स्वत: पोलीस ठाण्यामध्ये जातात, याचा अर्थ यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी केला.



    ब्रुक फार्मा कंपनीनं रेमडीसीवीरचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी काल कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे समजताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वस्तुस्थिती सांगून पोलीस कारवाई आणि पुढचे टॉर्चर रोखले होते.

    केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांनी राज्य सरकारशी संपर्क साधला होता. आमच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे तो विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. डोकानिया यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली होती, असा दावाही मलिक यांनी केला आहे. शिवसेनेने यावर सगळ्या मराठी केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवत बेछूट टीका केली आहे.

    corona and politics both on rampage in maharashtra

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस