विशेष प्रतिनिधी
नाशिक : श्रीक्षेत्र काशी मधील श्री गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरीची आरती व्हावी या हेतूने राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने पुढाकार घेतल्यानंतर गोदावरी आरती संदर्भात पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यातला वाद उफाळला. तो अद्यापही कायम राहिला असून गोदावरी तीरावर दुतोंड्या मारुती पाशी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती उद्या सायंकाळी 6.00 गोदावरी आरतीचा उपक्रम आयोजित करणार आहे. समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी ही माहिती दिली.Controversy of Godavari Aarti continues, but Ramtirth Godavari Seva Samiti’s grand Godaarti will be held tomorrow by Dutonya Maruti!!
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी आरती उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, श्री सुमंताश्रमजी महाराज उपाख्य स्वामी सखा, अमृताश्रम महाराज उपाख्य जोशी बाबा (बीड), नाशिक मधील इस्कॉनचे प्रमुख ब्रह्मचारी शिक्षाष्टकम दास, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, नाशिक मधील तिन्ही आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, श्री दत्तदास महाराज, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्कप्रमुख माधवदास राठी महाराज, श्री श्री कंठानंद, गोपीनाथजी दीक्षित परेश बाबा आदी मान्यवरांना गोदावरी आरती उपक्रमाचे निमंत्रण दिले असून त्यांच्या गरिमामयी उपस्थितीत गोदावरी आरतीचा भव्य उपक्रम करण्याचा मानस रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने व्यक्त केला आहे.
काशी क्षेत्रातील श्री गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरती देखील भव्य स्वरूपात व्हावी, यासाठी शासनाने रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गठित केली. गोदावरी आरती उपक्रम आणि गोदावरीचा विकास या दृष्टीने शासनाने 11 कोटींचा निधी दिला. या पार्श्वभूमीवर पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यातला वाद उफाळून आला. आरतीसाठी निधी कुणी गोळा करायचा आणि तो कुणाकडे सोपवायचा, हा या वादाचा मुख्य विषय राहिला. दोन्ही बाजूंनी वाद – प्रतिवाद केले.
पुरोहित संघ आणि त्यांच्या काही सदस्यांनी लाठ्या-काठ्या हाती घेण्याची भाषा वापरली. रामकुंडावर गोदावरी आरती करण्याचा पुरोहित संघाचा वंशपरंपरागत अधिकार आहे. इतरांचा नाही. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती बरखास्त करावी. त्यांना रामकुंडावर येऊच देणार नाही, अशी भूमिका घेत पुरोहित संघ संघर्षाच्या मानसिकतेत आला. पण रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आम्ही लाठ्या – काठ्या प्रसाद स्वरूपात स्वीकारू, अशी भूमिका घेत गोदावरी आरती करण्यावर मात्र ठाम मानसिकता ठेवली.
दोन्ही बाजूंनी शासनाकडे अर्ज करत संरक्षण मागितले. गोदावरी आरतीच्या निमित्ताने नाशिक मध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलीस घेतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. दोन्ही बाजू ऐकून घेऊन स्थानिक परिस्थिती विषयी आकलन करून शासनाला अहवाल पाठवण्यात येईल आणि शासनाच्या आदेशाबर हुकूम अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आता पुरोहित संघ रामकुंडावर, तर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती दुतोंड्या मारुती पाशी गोदावरी आरतीचा उपक्रम घेणार आहे.
Controversy of Godavari Aarti continues, but Ramtirth Godavari Seva Samiti’s grand Godaarti will be held tomorrow by Dutonya Maruti!!
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना महाअधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापूरला मिळाली 634 कोटींच्या विकासकामांची भेट!!
- कमलनाथ मुलासह दिल्लीत, 30 आमदारही भाजपमध्ये जाणे शक्य; काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे 13 वे माजी मुख्यमंत्री
- पाकिस्तानच्या निवडणुकीत हेराफेरी, मतदान अधिकाऱ्याचा खुलासा- इम्रान समर्थक अपक्ष उमेदवारांना पराभूत केले
- Nakul Nath Profile: कोण आहेत नकुलनाथ? कसे आले राजकारणात, मोदी लाटेत झाले होते खासदार, आता भाजपमध्ये जाणार?