“करोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. करोना थोतांड आहे,” असंही भिडे म्हणाले.Controversial statement by Sambhaji Bhide; Said – Hindustan is the country of shameless people
विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगलीत शुक्रवारी दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी बोलत होते.स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.अस विधान संभाजी भिडेंनी केलं आहे.जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. एक नंबर लोकसंख्या असलेला देश चीन आहे.जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्र आहेत. त्या सर्व राष्ट्रात बेशरमपणाचा देश म्हणजे हा हिंदुस्थान आहे आणि याची कोणाला लाज वाटत नाही, अस देखील भिडे म्हणाले.
संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा करोनावर बोलताना चीनवर टीकेची झोड उठवली. करोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. “करोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. करोना थोतांड आहे,” असंही भिडे म्हणाले.
संभाजी भिडे म्हणाले की, दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत. जसे प्रभू रामचंद्र विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवलाय. शिवाजी-संभाजी महाराजांची अंतकरणात वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते.
समस्त मुस्लिम समाजाने आदिलशाही, निजामशही, कुतुबशाही यांनी आपल्या समाजाचे नुकसान केले आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी झटले.आता आपली वेळ आहे. यासाठी प्रयत्न करूया. जोपर्यंत हिंदू राष्ट्राची जाण असणारे शासन, सरकार सत्तेत येणार नाही, तोपर्यंत आपले हिंदू राष्ट्र निर्माण होणार नाही.
Controversial statement by Sambhaji Bhide; Said – Hindustan is the country of shameless people
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ’15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’
- सचिनने शोधलाय नवा हिरा ! टीम इंडियाला मिळणार रशीद खानसारखा अव्वल क्रिकेटपटू
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन