विशेष प्रतिनिधी
मुबंई : सध्या विक्रम गोखले हे नाव इंटरनेटवर चर्चेचा मोठा विषय बनला आहे. कधी भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबद्दल बोलल्यामुळे, तर कधी कंगनाची बाजू घेतल्यामुळे, तर कधी राजकिय व सामाजिक क्षेत्रावर केलेल्या टीकेमुळे ते सतत चर्चेत असतात. शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे गोखले सध्या चर्चेत आहेत.
Consider the martyred soldiers as heroes instead of considering Aryan who came out on bail ; Shah Rukh will not be able to do anything to me; Actor Vikram Gokhale
रविवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले की, आर्यन खानला काही दिवसांपूर्वी एसीबीने अटक केली होती. तो सध्या जामीनावर बाहेर आहे. बऱ्याच लोकांनी आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर त्याला हिरो समजले. पण त्याला जामीन मिळाल्यानंतर हिरो समजण्यापेक्षा आपल्या देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना तुम्ही हिरो समजले पाहिजे. हे दोघे माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत.
त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवरही कडाडून टीका केली आहे. शाहरुख खान आणि आर्यन खान बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आणि या सर्व गोष्टींमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
“पद्म पुरस्कार येत आहे” , विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया
विक्रम गोखले यांनी कंगना राणावतची बाजू घेताना म्हटले होते की, कंगना जे बोलली आहे, ते खरं आहे. भारताला स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालेले आहे. खरं स्वातंत्र्य दिलं 2014 मध्येच मिळाले आहे. असे कंगना म्हणाली होती आणि या तिच्या विधानाला विक्रम गोखले यांनी सहमती दर्शवली होती. त्यानंतर त्यांना इंटरनेटवर बरेच ट्रोल करण्यात आले होते.
Consider the martyred soldiers as heroes instead of considering Aryan who came out on bail ; Shah Rukh will not be able to do anything to me; Actor Vikram Gokhale
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
- Mumbai Cruise Drugs Case : गोसावी आणि खबऱ्याची चॅट उघड, मुंबई पोलीस एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी बजावणार तिसरी नोटीस
- पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!
- मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा