विशेष प्रतिनिधी
मुंबई : कार्यकर्ते खेळले “लाडू” आणि “चिखल” महाराष्ट्रात नानांच्या नावाचा झाला “शंख” आणि “गजर”!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर आणली. Congress workers washed nana parole’s mud plated feet
त्याचे झाले असे :
नानांचा काही महिन्यांपूर्वी वाढदिवस झाला तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांची लाडू तुला केली. त्या लाडूंवर नानांच्या नावाने भावी मुख्यमंत्री असे लिहिण्यात आले होते. अर्थात कार्यकर्त्यांचा तो उत्साह होता. त्यामुळे “भावी मुख्यमंत्री” नाना पटोले यांची बातमी सोशल मीडिया सह वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जोरदार व्हायरल झाली. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. नानांचे नाव एकदम मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आले.
पण नानांच्या नावाचा “गजर” फक्त मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेपुरता थांबला नाही. त्या पलीकडे जाऊन एका घटनेमुळे नानांच्या नावाने सगळीकडे “शंख” झाला. याला कारणीभूत अकोल्यामध्ये एक वेगळी घटना ठरली. नाना गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला गेले. तिथे पाऊस पडला असल्यामुळे त्यांचे पाय चिखलाने माखले.
नाना दर्शन घेऊन परत आपल्या गाडीकडे आले. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांचे चिखलाने माखलेले पाय स्वतःच्या हाताने धुतले. या सगळ्या घटना क्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे नानांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात “शंख” झाला. नाना मर्यादा पाळा स्वतःला संत समजू नका अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी नानांचे वाभाडे काढले. सोशल मीडियावर नाना ट्रोल झाले.
नानांनी त्यावर आपण संत वगैरे नसल्याचा खुलासा केला. कार्यकर्त्याने उत्साहाने पाय धुतले मी त्याला नको म्हणत होतो. पण त्याने ऐकले नाही, असा खुलासा त्यांनी केला. पण एकूण नानांच्या नावाचा जो “गजर” आणि “शंख” व्हायचा होता, तो झालाच!!
Congress workers washed nana parole’s mud plated feet
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार